Friday, February 7, 2025
Homeताज्या घडामोडीRahul Gandhi Exposed : खरा चेहरा समोर आला!

Rahul Gandhi Exposed : खरा चेहरा समोर आला!

देशविरोधी वक्तव्यावरून अडकले विरोधी पक्षनेते राहुल गांधी

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा आणि सरकार विरोधात टीका करताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आमची लढाई भारताच्या विरोधात असल्याचे गंभीर वक्तव्य केले. यावरून राहुल यांच्यावर चौफेर टीका होत असून त्यांचा खरा चेहरा समोर आल्याचे (Rahul Gandhi Exposed) भाजपाने म्हटले आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना वर्षपूर्तीच्या निमित्ताने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले होते की, “अनेक शतकांपासून शत्रूच्या हल्ल्यांना तोंड देणाऱ्या देशाला खऱ्या स्वातंत्र्याची गरज होती, ते या दिवशी प्राप्त झाले.” सरसंघचालकांच्या या विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज, बुधवारी चांगलीच आगपाखड केली.

दिल्ली येथे काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी राहुल गांधी म्हणाले की, भागवत यांचे विधान देशद्रोही असून ते इतर कुठल्या देशात असते तर त्यांना अटक झाली असती. आपली लढाई आरएसएस, भाजपा आणि भारताच्या विरोधात असल्याचे राहुल गांधी म्हणाले. दिल्लीच्या कोटला रोड कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी राहुल गांधींनी केलेल्या या विधानामुळे कडाक्याच्या थंडीतही राजकीय पारा प्रचंड चढला आहे.

Meta Layoff : मार्क झुकरबर्ग ३ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता!

भाजपा नेत्यांनी राहुल गांधींवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी हे भारताच्या विरोधात असून या कटू सत्याची त्यांनी स्वत: जाहीर कबुली दिल्याबद्दल त्यांचे कौतुक करतो, अशा शब्दात भाजपा नेते जगतप्रकाश नड्डा यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर जोरदार टीकास्त्र सोडले.

यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) जेपी नड्डा म्हणाले की, काँग्रेसचे कुरूप सत्य त्यांच्याच नेत्याने उघड केले आहे. ते भारताविरुद्ध लढत आहेत हे देशाला माहीत असले तरी त्याची जाहीर कबुली दिल्याबद्दल मी राहुल गांधींचे कौतुक करतो. राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाचे अर्बन नक्षल आणि भारताला बदनाम, अपमानित आणि बदनाम करणाऱ्या डीप स्टेटशी जवळचे संबंध आहेत हे लपून राहिलेले नाही. त्याच्या वारंवार केलेल्या कृतींमुळेही हा विश्वास दृढ झाला झाल्याचे नड्डा यांनी सांगितले.

अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, संविधानावर शपथ घेतलेले विरोधी नेते असे म्हणत आहेत की, ते भारतीय राज्याविरुद्ध लढत आहेत अशी टीका सीतारामन यांनी केली. तर राहुल गांधींच्या वक्तव्याची काही सेकंदांची व्हिडिओ क्लिप ट्वीटरवर (एक्स) शेअर करत अमित मालवीय म्हणाले की, “राहुल गांधींनी आता भारतीय राजकीय व्यवस्थेविरुद्ध उघड लढा जाहीर केला आहे.” हे थेट जॉर्ज सोरोसच्या प्लेबुकमधून आहे,” असे मालवीय यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -