Tuesday, February 11, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSaif Ali Khan attack : 'या' कडक्याने सैफवर केला चाकू हल्ला

Saif Ali Khan attack : ‘या’ कडक्याने सैफवर केला चाकू हल्ला

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीचा चेहरा एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसला आहे. पोलिसांनी या फूटेजच्या मदतीने हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे. सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या सर्व नोकरांची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून हल्लेखोराविषयी अधिक माहिती मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.

Ajintha Verul Film Festival : पद्मभूषण सई परांजपे यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान

फूटेजमध्ये दिसणारी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या हडकुडी दिसत आहे. या कडक्या व्यक्तीने बेसावध असलेल्या सैफ अली खानवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात सैफच्या शरीरावर सहा मोठ्या जखमा झाल्या. यापैकी दोन जखमा अतिशय गंभीर स्वरुपाच्या होत्या. सैफच्या कंबरेजवळ मणक्यात चाकूचा सुमारे अडीच इंचाचा तुकडा अडकला. यामुळे सैफच्या हालचाली मंदावल्या. सैफ आता विरोध करणार नाही याची जाणीव होताच हल्लेखोराने घटनास्थळावरुन वेगाने पळ काढला. तो इमारतीच्या पायऱ्यांवरुन वेगाने पळत असताना सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे.

Oscars ceremonyला आगीचा फटका! अमेरिकेतील ऑस्कर २०२५ सोहळा रद्द होणार?

अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी १६ जानेवारी रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास चाकूने हल्ला झाला. या हल्ल्यात सैफच्या शरीरावर सहा मोठ्या जखमा झाल्या. यापैकी दोन जखमा गंभीर स्वरुपाच्या होत्या. गंभीर जखमी झालेल्या सैफ अली खानला त्याचा मोठा मुलगा इब्राहिम याने रुग्णालयात दाखल केले. सैफवर पहाटे पाचच्या सुमारास आणि सकाळी नऊच्या सुमारास अशा दोन शस्त्रक्रिया झाल्या. लिलावती रुग्णालयातील डॉ. निरज उत्तमानी आणि न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांच्या नेतृत्वात सैफवर उपचार सुरू आहेत. चाकूने झालेल्या जखमांवर उपचार करण्यासाठी डाव्या हातावर आणि मानेवर प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आली. डॉक्टर निना जैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेवेळी सैफवर लक्ष ठेवण्यासाठी कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर श्रीनिवास गोडबोले उपस्थित होते.

हाती आलेल्या माहितीनुसार सैफवर चाकू हल्ला करणारी व्यक्ती अद्याप फरार आहे. पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत. सैफच्या घरातील चार नोकरांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यात एक महिला नोकर आहे. या महिला नोकराशी चाकू हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा मध्यरात्री सैफच्या घरातील एका खोलीत वाद सुरू होता. या वादाचा आवाज ऐकून सैफ खोलीत आला. त्यावेळी संबंधित व्यक्तीने सैफवर चाकू हल्ला केला आणि घरातून पलायन केले. चाकू हल्ला करणाऱ्याने महिला नोकराच्या हातावर वार केला. तसेच अभिनेता सैफ अली खान याच्यावर सहा वार केले. यामुळे सैफच्या शरीरावर सहा मोठ्या जखमा झाल्या. यापैकी दोन जखमा गंभीर स्वरुपाच्या होत्या. महिला नौकरही चाकू हल्ल्यात जखमी झाली पण तिच्या जखमांचे स्वरुप जास्त गंभीर नव्हते. तातडीने उपचार केल्यामुळे महिला नोकराची तब्येतही स्थिर आहे. पोलिसांनी या महिला नोकराची सखोल चौकशी केली. चाकू हल्ला करणाऱ्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सैफ ज्या इमारतीत वास्तव्याला होता त्या इमारतीचे सीसीटीव्ही फूटेज तपासले. या फूटेजमध्ये थोड्या वेळासाठी चाकू हल्ला करणाऱ्याचा चेहरा दिसला आहे. पोलीस नोकरांकडून मिळालेली माहिती आणि फूटेजमध्ये दिसलेला चेहरा याच्या मदतीने हल्लेखोराला शोधत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -