पेण : पेण शहरातील फणसडोंगरी येथे राहणाऱ्या गणेश बाळू चुणारे या १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत फिर्यादी बाळू सीताराम चुणारे (वय – ५५ रा. फणसडोंगरी, अंबिका नगर, पेण) यांचा मुलगा गणेश चुणारे याची १० जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपीने हत्या करून त्याचा मृतदेह आंबेडकर शाळा येथील झुडपात टाकून दिला होता.
HMPV Virus : मुंबई, गुजरातसह आता आसाममध्येही एचएमपीव्ही व्हायरसची एन्ट्री!
याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे करीत आहेत.
यावेळी घटनास्थळी रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.