Wednesday, January 22, 2025
Homeब्रेकिंग न्यूजसरपंच हत्या, वाल्मिक कराड वगळून इतर ७ जणांवर मकोका

सरपंच हत्या, वाल्मिक कराड वगळून इतर ७ जणांवर मकोका

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या सात आरोपींविरोधात मकोकाची (MAHARASHTRA CONTROL OF ORGANISED CRIME ACT / MCOCA) कलमे लावली जाणार आहेत. सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतिक घुले, सिद्धार्थ सोनवणे यांच्या विरोधात मकोकाची कलमे लावणार आहेत. पण या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड विरोधात मकोका अंतर्गत कारवाई होणार नाही. विशेष तपास पथकाने सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई सुरू केली आहे.

महाविकास आघाडी फुटली, उद्धव ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा

तपास पथकाच्या निर्णयावरुन राजकीय आरोप – प्रत्यारोपांना उधाण आले आहे. वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार आहे. पण राजकीय कनेक्शनमुळे त्याच्या विरोधात मकोका अंतर्गत कारवाई केलेली नाही, असा आरोप विरोधकांनी केला आहे. तर तपास पथकाने वेगळी माहिती दिली आहे.

मुंबईत ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ ताशी ८० किमी वेगाने धावणार

हत्या प्रकरणात खंडणीच्या एका प्रकरणाचीही संबंध आहे आणि वाल्मिक कराडला सध्या या खंडणी प्रकरणात अटक झाली आहे. अधिक तपास सुरू आहे, त्यामुळे सध्या वाल्मिक कराड विरोधात मकोका बाबत निर्णय झालेला नाही, असे तपास पथकाचे म्हणणे आहे. मात्र राजकीय कारणामुळेच वाल्मिक कराडला मकोका लावलेला नाही, असे विरोधक म्हणत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला वाल्मिक कराड प्रमाणेच खंडणीच्या संदर्भात अटक झाली आहे. मग त्याला मकोका लावण्याची तयारी सुरू आहे पण वाल्मिक कराडला वेगळा न्याय का ? असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -