Friday, May 1, 2026

Jalgaon : जळगाव–दिल्ली विमानसेवा तात्पुरती स्थगित; बहुप्रतिक्षीत विमानसेवा कधी सुरु होणार ?

Jalgaon : जळगाव–दिल्ली विमानसेवा तात्पुरती स्थगित; बहुप्रतिक्षीत विमानसेवा कधी सुरु होणार ?

जळगाव : अलायन्स एयर (Alliance Air) या विमान कंपनीतर्फे २ मेपासून सुरु होणारी बहुप्रतिक्षीत जळगाव–दिल्ली (इंदूरमार्गे) ही विमानसेवा (Jalgaon-Delhi flight) तांत्रिक अडचणींमुळे पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची माहित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दोन मेपासून या सेवेला प्रारंभ होणार असल्याची अधिकृत घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. मात्र, नियोजित उड्डाणापूर्वी घेण्यात आलेल्या चाचणी उड्डाणात विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आल्याने कंपनीने सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. किमान तीन आठवड्यांनंतरच ती सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Jalgaon-Delhi flight service temporarily suspended)

उद्घाटनाआधीच अडथळा

दरम्यान, गेल्या आठवड्यात कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर या मार्गासाठी तिकीट बुकिंगची प्रक्रिया देखील सुरु करण्यात अली होती. त्यानुसार, अनेक प्रवाशांनी २ मे रोजीच्या उद्घाटन उड्डाणासाठी आगाऊ नोंदणी केली होती. मात्र, अचानक सेवा पुढे ढकलल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित प्रवाशांना धक्का बसला आहे. कंपनीने सर्व प्रवाशांना ई-मेलद्वारे उड्डाण रद्द झाल्याची माहिती दिल्याचे सांगितले जात असून, त्यांच्या बुकिंग संदर्भात पुढील पर्याय देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. (Jalgaon-Delhi flight service temporarily suspended)

या विमानसेवेअंतर्गत जळगाव-इंदूर-दिल्ली (Jalgaon-Delhi flight) असा मार्ग निश्चित करण्यात आला होता. आठवड्यातील मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी ही सेवा उपलब्ध राहणार होती. नियोजित वेळापत्रकानुसार दिल्लीहून दुपारी ४.५० वाजता उड्डाण करणारे विमान इंदूर येथे सुमारे २५ मिनिटे थांबून रात्री ७.५५ वाजता जळगाव येथे दाखल होणार होते. त्यानंतर जळगावहून रात्री ८.२० वाजता उड्डाण घेऊन तेच विमान इंदूरमार्गे दिल्लीला रात्री ११.२० वाजता पोहोचणार होते. या सेवेच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना थेट राजधानीशी हवाई जोडणी मिळणार असल्याने व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी तसेच शासकीय कामकाजासाठी प्रवास करणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. (Jalgaon-Delhi flight service temporarily suspended)

सध्या कंपनीने या मार्गासाठी पुढील तीन आठवड्यांपर्यंत सर्व बुकिंग तात्पुरते बंद केले आहे. विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर किमान एक आठवडा आधी तिकीट बुकिंग पुन्हा सुरू करण्यात येईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या मार्गासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एअरक्राफ्टची अभियांत्रिकी विभागाकडून सखोल तपासणी करण्यात येत असून, इंजिनमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >