एप्रिल ते डिसेंबर दरम्यान १०४ कोटींहून अधिक दंड केला वसूल
मुंबई : मुंबई उपनगरीय लोकल ट्रेन्स, मेल/एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन्स आणि हॉलिडे स्पेशल ट्रेन्समध्ये तिकीट नसलेल्या/अनियमित प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून सतत तिकीट तपासणी मोहीम राबवली जात आहे. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अत्यंत अनुभवी तिकीट तपासणी पथकाद्वारे एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत अनेक तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली, परिणामी मुंबई उपनगरीय विभागातून वसूल झालेल्या ३३.९८ कोटी रुपयांसह १०४.४५ कोटी रुपये वसूल झाले.
Tirupati Stampede: टोकन वाटायला सुरूवातही झाली नाही आणि चेंगराचेंगरी सुरू…जाणून घ्या काय घडलं नेमकं
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, डिसेंबर २०२४ मध्ये बुक न केलेल्या सामानासह १.८९ लाख तिकीटविहीन/अनियमित प्रवाशांचा शोध घेऊन १०.९८ कोटी रुपये वसूल करण्यात आले. याशिवाय डिसेंबर महिन्यातही पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात ८५ हजार प्रकरणे शोधून ३.३५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. एसी लोकल गाड्यांमधील अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी नियमित सरप्राईज तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. या मोहिमेचा परिणाम म्हणून, एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ४५,००० हून अधिक अनधिकृत प्रवाशांना दंड आणि १५१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने सर्वसामान्यांना नेहमी योग्य आणि वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.