Monday, February 10, 2025
HomeदेशTirupati Stampede: टोकन वाटायला सुरूवातही झाली नाही आणि चेंगराचेंगरी सुरू...जाणून घ्या काय...

Tirupati Stampede: टोकन वाटायला सुरूवातही झाली नाही आणि चेंगराचेंगरी सुरू…जाणून घ्या काय घडलं नेमकं

नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातील तिरूपती देवस्थान हे भारतातील इतर देवस्थानांपैकी एक मोठे भक्तीमय स्थान आहे. येथे बुधवारी रात्री चेंगराचेंगरी(Tirupati Stampede) झाली. या चेंगराचेंगरीत ६ लोकांचा मृत्यू झाला. खरंतर तिरूपती मंदिराच्या विशेष वैकुंठ द्वार दर्शनसाठी ८ ठिकाणी टोकन काऊंटर बनवण्यात आले होते. या दरम्यान बैरागी पट्टेदा आणि एमजीएम स्कूलच्या काऊंटवर गोंधळ झाला. येथे हजारोच्या संख्येने गर्दी होती. या चेंगराचेंगरीत अनेक लोक दबले गेले. यात ६ जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले. या मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

तिरूपती मंदिरात झालेल्या दुर्घटनेत २५ जण जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या अपघाताप्रकरणी दु:ख व्यक्त केले. टोकन घेण्यासाठी बनवण्यात आलेल्या केंद्रांवर टोकन वाटण्यास सुरूवातही केली नव्ही. मात्र त्याआधीच चेंगराचेंगरी झाली आणि इतकी मोठी दुर्घटना घडली. आज सकाळी १० वाजता चंद्राबाबू नायडू जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचतील.

टोकन घेण्यासाठी रात्रीपासूनच गर्दी

दर वर्षी वैकुंठ एकादशीला तिरूपती वैकुंठ द्वार दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी उसळते. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या काळात तिरूपती दर्शनसाठी येतात. यावेळेस वैकुंठ द्वार दर्शन १० जानेवारी ते १९ जानेवारीदरम्यान होत आहे. यासाठी टोकन वाटण्याची व्यवस्था करण्यात आली होती. टोकन ९ जानेवारीला सकाळी वाटले जाणार होते. यासाठी ८ जानेवारीच्या रात्रीपासूनच लोकांची मोठी गर्दी जमली होती. मात्र टोकन वाटलेही गेले नाही आणि त्याआधीच ही दुर्घटना घडली.

आंध्र प्रदेश: तिरूपती मंदिरात चेंगराचेंगरी दरम्यान ६ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख

पंतप्रधान मोदींनी या घटनेप्रकरणी ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे.

 

१० जानेवारीपासून सुरू होणार दर्शन

वैकुंठ द्वार दर्शन १० ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान होणार आहे. प्रोटकॉलनुसार १० जानेवारीला दर्शन सकाळी साडेचार वाजल्यापासून सुरू होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -