

Earthquake: नेपाळमध्ये ७.१ तीव्रतेचा जोरदार भूकंप, बिहार, सिक्कीम आणि बंगालच्या अनेक भागांमध्ये धक्के
नवी दिल्ली: नेपाळसह देशातील अनेक राज्यांमध्ये मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी होती. बिहार, ...
अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागाने आणि भारताच्या राष्ट्रीय भूकंप केंद्राने ७.१ रिश्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद केली आहे तर चीनच्या शिन्हुआ या वृत्तसंस्थेने ६.८ रिश्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाल्याचे वृत्त दिले आहे.
भूकंपामुळे जमीन हादरली. नेपाळमध्ये नागरिक घाबरून घरांबाहेर आले आणि बराच वेळ रस्त्यांवरच उभे होते. भारतात बिहार आणि उत्तर प्रदेशसह दिल्ली एनसीआरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. याआधी डिसेंबर २०२३ मध्ये चीनच्या गांसु आणि किंघई प्रांतात ६.२ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे १२६ जणांचा मृत्यू झाला होता.