नवी दिल्ली: नेपाळसह देशातील अनेक राज्यांमध्ये मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी होती. बिहार, सिक्कीम, आसाम आणि बंगालसह भारतातील अनेक भागांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले. तिब्बतमध्ये ६.८ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला.
बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोतिहारी, समस्तीपूर, दरभंगा, मधुबनी, पूर्णिया, सिवान, अररिया, सुपौल आणि मुझ्झफरपूरमध्ये सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारासा भूकंपाचे धक्के जाणवले. माल्दासह उत्तर बंगालच्या काही भागांमध्ये तसेच सिक्कीमध्येही हे धक्के जाणवले. असे सांगितले की पाच सेकंदापर्यंत धरती हलत होती. लोकांना भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर ते आपल्या घरातून बाहेर निघाले.
नेपाळमध्ये भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार भूकंपाचे केंद्रबिंदु नेपाळ-तिबेट सीमेच्या जवळ शिजांगमध्ये होते.
#WATCH | Earthquake tremors felt in Bihar’s Sheohar as an earthquake with a magnitude of 7.1 on the Richter Scale hit 93 km North East of Lobuche, Nepal at 06:35:16 IST today pic.twitter.com/D3LLphpHkU
— ANI (@ANI) January 7, 2025
नेपाळ सरकारचा दुजोरा
नेपाळ सरकारनेही मंगळवारी सकाळी नेपाळमध्ये भूकंप आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भूकंपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात जमीन हलताना दिसत आहे. आतापर्यंत भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जिवीत अथवा वित्तहानी झाल्याची बातमी नाही.