Sunday, August 9, 2026

Russia-India Trade : भारतासाठी रशियाची मोठी योजना; हिंद महासागरापर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याचा विचार

Russia-India Trade : भारतासाठी रशियाची मोठी योजना; हिंद महासागरापर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याचा विचार
मुंबई : भारत आणि रशियामधील व्यापार संबंध आणखी मजबूत करण्यासाठी रशिया नव्या पर्यायी मार्गाचा विचार करत आहे. रशियातून हिंद महासागरापर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याची शक्यता तपासली जात असून, या माध्यमातून भारतासह आशियातील देशांशी जमिनीवरील व्यापार वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. रशियाचे उपपंतप्रधान मरात खुसनुलिन यांनी सरकारी वृत्तसंस्था TASS ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत माहिती दिली. (Russia India Relation)
सध्या रशिया आणि भारतामधील व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात सागरी मार्गांचा वापर केला जातो. मात्र, बोस्फोरस आणि स्ट्रेट ऑफ हॉरमुझसारख्या महत्त्वाच्या सागरी मार्गांवरील वाढत्या जोखमी लक्षात घेता पर्यायी मार्ग तयार करण्याची गरज असल्याचे रशियाचे मत आहे. रेल्वे मार्ग विकसित झाल्यास सागरी वाहतुकीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होऊ शकते. (Russia India Trade) प्रस्तावित मार्ग मध्य आशिया आणि पश्चिम आशियातील काही देशांमधून जाण्याची शक्यता आहे. यामध्ये तुर्कमेनिस्तान, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा समावेश होऊ शकतो. हा मार्ग प्रत्यक्षात साकारल्यास रशियातून भारतापर्यंत माल पोहोचवण्यासाठी नवा ट्रेड कॉरिडॉर तयार होऊ शकतो. त्यामुळे मालवाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होण्यासोबतच व्यापाराचा वेळही कमी होण्याची शक्यता आहे. (Trade Corridor) हॉरमुझच्या वाढत्या महत्त्वामुळेही रशियाची चिंता वाढली आहे. हा जलमार्ग जागतिक तेल आणि LNG व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या भागातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास आंतरराष्ट्रीय व्यापारावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रशियाला आपल्या व्यापारासाठी अधिक सुरक्षित आणि स्थिर पर्याय तयार करायचा आहे. (Strait of Hormuz) भारत हा रशियाचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे. ऊर्जा, संरक्षण आणि इतर क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांचे संबंध आहेत. त्यामुळे भारताशी थेट भू-मार्गाने जोडणी झाल्यास व्यापाराला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अनेक देशांमधून जाणारे हे मोठे रेल्वे नेटवर्क उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक, सुरक्षा व्यवस्था आणि संबंधित देशांचे दीर्घकालीन सहकार्य आवश्यक असेल. त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात येण्यासाठी मोठे आव्हान पार करावे लागणार आहे. (Russia)  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >