महाराष्ट्रातून HMPV बाबत महत्त्वाची अपडेट

  94

मुंबई : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील बाप्टिस्ट रुग्णालयात दोन ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (Human metapneumovirus - HMPV) बाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात तीन महिन्यांची चिमुरडी आणि आठ महिन्यांचा चिमुरडा यांचा समावेश आहे. खासगी लॅबच्या अहवालांआधारे दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप कर्नाटकच्या सरकारी लॅबने दोन्ही रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी केलेली नाही. पण बंगळुरूत ह्युमन मेटान्यूमोव्हायरसबाधीत रुग्ण आढळताच देशभर सरकारी यंत्रणा जागी झाली आहे.



महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने गुरुवारी ह्युमन मेटान्यूमोव्हायरस संदर्भात खबरदारीचे उपाय करण्यासाठी मुंबईत बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रात अद्याप ह्युमन मेटान्यूमोव्हायरसबाधीत एकही रुग्ण आढळलेला नाही. पण खबरदारीचे उपाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



लवकरच उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारनेही खबरदारीचे उपाय करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. सध्या ह्युमन मेटान्यूमोव्हायरसबाधीत सर्वाधिक रुग्ण चीनमध्ये आहेत. त्यामुळे चीनमधून येणाऱ्या नागरिकांना भारतात थेट प्रवेश देऊ नये. चीनमधून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची वैद्यकीय तपासणी करावी, अशीही मागणी होऊ लागली आहे. या संदर्भात लवकरच केंद्र सरकार धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे.



ह्युमन मेटान्यूमोव्हायरसची कमी - जास्त प्रमाणात बाधा झाल्यामुळे इन्फ्लूएंझा ए, एचएमपीव्ही, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, कोविड-१९ असे वेगवेगळे संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका असतो. सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसला आळा घालण्यासाठी लस अस्तित्वात नाही. तसेच मानवी मेटान्यूमोव्हायरसची बाधा झाल्यास बरे करण्यासाठी एकही ठोस औषध उपलब्ध नाही. रुग्णाला मानवी मेटान्यूमोव्हायरसची बाधा झाली तर सुरुवातीला सर्दी - खोकला, ताप अशी सामान्य लक्षणे दिसतात आणि हळू हळू परिस्थिती बिघडते. पण या संकटावर मात करण्यासाठी उपाय सापडलेला नाही. या पार्श्वभूमीवर तब्येतीची काळजी घ्या, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने नागरिकांना केले आहे.

हे करा

खोकताना किंवा शिंकताना नाकातोंडासमोर हातरुमाल, टिश्यू पेपर धरा
बाहेरून आल्यावर तसेच खोकल्यावर, शिंकल्यावर, लिक्विड सोप किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझर अथवा साबण आणि पाणी यांचा वापर करून हात स्वच्छ धुवा
ताप, सर्दी, खोकला, शिंका अशा स्वरुपाचा त्रास वारंवार होत असल्यास वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार करा आणि गरजेशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा. तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कने नाक - तोंड झाकून घ्या.
पुरेसे पाणी प्या. सकस आहार घ्या.
वास्तव्याच्या आणि कामाच्या ठिकाणी हवा खेळती राहील याची खबरदारी घ्या.

हे करू नका

हस्तांदोलन
हातरुमाल, टिश्यू पेपर यांचा पुनर्वापर
रुग्णाशी जवळचा संपर्क
डोळे, नाक, तोंड यांना वारंवार स्पर्श करणे
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्वतःच औषधोपचार करणे
Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही