Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीKumbhmela 2025 : कुंभमेळ्याला जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! भारतीय रेल्वेकडून विशेष गाड्यांचे नियोजन

Kumbhmela 2025 : कुंभमेळ्याला जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! भारतीय रेल्वेकडून विशेष गाड्यांचे नियोजन

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराजमध्ये १२ वर्षानंतर महाकुंभमेळा (Maha Kunbhmela 2025) भरविला जातो. महाकुंभाला जाण्यासाठी देशातीलच नव्हे तर परदेशातील लोकही आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे तिकीट बुकींग करताना भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यंदा १३ जानेवारीपासून कुंभमेळ्याची सुरूवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने कुंभमेळा पार्श्वभूमीवर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व भाविकांना याचा चांगलाच फायदा होणार आहे.

Rajagopala Chidambaram : अणुशास्त्रज्ञ आर. चिदंबरम यांचे निधन!

मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) महाकुंभासाठी ७ राज्यांतून विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. पाहा कसे असेल वेळापत्रक.

पुणे ते प्रयागराज दरम्यान विशेष ‘भारत गौरव ट्रेन’

कुंभमेळ्यासाठी आयआरसीटीसीने पुणे ते प्रयागराज दरम्यान ‘भारत गौरव ट्रेन’ सुरू केली आहे. ही विशेष ट्रेन १५ जानेवारी ते २३ फेब्रुवारी दरम्यान धावणार आहे. देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘देखो अपना देश’ कार्यक्रमाशीही हा उपक्रम जोडला गेला आहे. भारत गौरव ट्रेनमध्ये प्रवाशांना प्रवासासोबतच जेवण आणि राहण्याची सुविधाही मिळणार आहे.

काय आहे तिकीट दर?

पुण्याहून प्रयागराजला जाणाऱ्या या भारत गौरव ट्रेनचे इकॉनॉमी क्लास (स्लीपर) तिकीट २२ हजार ९४० रुपये आहे. मानक वर्ग म्हणजेच ३एसी तिकीट ३२ हजार ४४० रुपये आहे. कम्फर्ट क्लास २एसी तिकिटाची किंमत ४० हजार १३० रुपये आहे.

दरम्यान, भारतीय रेल्वेने महाकुंभासाठी ७ राज्यांतून विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रातून धावणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

  • ट्रेन क्रमांक ०४५२६ पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी भटिंडा येथून धावेल आणि रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी प्रयागराजला पोहचेल. ही ट्रेन १९, २२, २५ जानेवारी आणि १८ व २२ फेब्रुवारी रोजी सोडण्यात येणार आहे.
  • ट्रेन क्रमांक ०४६६४ दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी फिरोजपूर, पंजाब येथून धावेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी प्रयागराजला पोहोचेल. ही ट्रेन २५ जानेवारी रोजी सोडण्यात येईल.

त्याचबरोबर रिटर्न ट्रेन क्रमांक ०४६६३, २६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी प्रयागराजहून सुटेल व ती ४ वाजून ४५ मिनिटांनी फिरोजपूरला पोहचेल.

  • ट्रेन क्रमांक ०४५२८ रात्री १० वाजून ५ मिनिटांनी हिमाचलच्या अंब अंदौरा येथून धावेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता प्रयागराजला पोहचेल. ही ट्रेन १७, २०, २५जानेवारी आणि ९, १५, २३ फेब्रुवारी रोजी सोडण्यात येईल.

तसेच रिटर्न ट्रेन क्रमांक ०४५२७ प्रयागराजहून १८, २१, २६ जानेवारी आणि १०, १६ व २४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी परतीच्या प्रवासाला निघेल.

  • ट्रेन क्रमांक ०४३१६ सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी डेहराडूनहून धावेल आणि रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी प्रयागराजला पोहचेल. ही ट्रेन १८, २१, २४ जानेवारी आणि ९, १६, २३ फेब्रुवारीला धावेल.

तर रिटर्न ट्रेन क्रमांक ०४३१५, १९, २२, २५ जानेवारी आणि १०, १७, २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि डेहराडूनला परत येईल.

  • ट्रेन क्रमांक ०४६६२ रात्री ८ वाजून १० मिनिटांनी अमृतसरहून धावेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता फाफामौ प्रयागराजला पोहचेल. ही ट्रेन ९ व १९ जानेवारी आणि ६ फेब्रुवारी रोजी धावेल.

तर रिटर्न ट्रेन क्रमांक ०४६६१, ११ व २१जानेवारी आणि ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी अमृतसरला पोहचेल.

  • ट्रेन क्रमांक ०४०६६ रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी दिल्लीहून धावेल व दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी प्रयागराजला पोहचेल. ही ट्रेन १०, १८, २२, ३१ जानेवारी आणि ८, १६, २७ फेब्रुवारी रोजी धावेल.

रिटर्न ट्रेन क्रमांक ०४०६५, ११, १९, २३ जानेवारी आणि १, १७, १८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी अमृतसरला पोहचेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -