मुंबई : देशातील ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ राजगोपाल चिदंबरम (Rajagopala Chidambaram) यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ८८ वर्षांचे होते. चिदंबरम यांनी पहाटे ३ वाजून २० मिनिटांच्या सुमारास मुंबईच्या जसलोक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले. चिदंबरम यांना १९७५ आणि १९९९ मध्ये पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपासून चिदंबरम यांची प्रकृती ठीक नव्हती. शास्त्रज्ञ म्हणून डॉ. चिदंबरम यांनी भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून काम केले होते. तसेच १९९४-९५ दरम्यान आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या संचालक मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. डॉ. चिदंबरम हे भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागारही होते. डॉ. चिदंबरम यांनी भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली – पोखरण-I (१९७५) आणि पोखरण-२ (१९९८) च्या चाचणी तयारीचे आयोजन.
अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापराचे समर्थक, त्यांनी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे नेतृत्व केले. डॉ. चिदंबरम यांना पद्मश्री (१९७५) आणि पद्मविभूषण (१९९९) यांच्यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.