नवी दिल्ली : पंजाबी आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक गुरु रंधावा (Guru Randhawa) यांच्या जिमबाहेर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीतील पश्चिम विहार परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी जिमच्या दिशेने अंदाजे सात राऊंड गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Guru Randhawa)
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी जिमजवळ पोहोचताच अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात जिमच्या काचा फुटल्या असून मालमत्तेचे नुकसान झाले आहे. घटनेच्या वेळी परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, कोणालाही दुखापत झालेली नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
- राज ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिकांना आवाहन; १४ जूनला मुंबईत नसल्याने भेटीला येऊ नका मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) ...
दरम्यान, घटनेनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून त्यामध्ये लोरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi Gang) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय एक ऑडिओ क्लिपही समोर आली असून त्यात स्वतःला टोळीचा सदस्य सांगणारी व्यक्ती हा हल्ला जाणीवपूर्वक केल्याचा दावा करताना ऐकू येत आहे.
व्हायरल ऑडिओमध्ये गायक गुरू रंधावाचे सलमान खान (Salman Khan) यांच्याशी असलेले कथित संबंध हे हल्ल्याचे कारण असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची किंवा सोशल मीडिया पोस्टची सत्यता अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांची अनेक पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली जात आहे. तसेच व्हायरल पोस्ट आणि ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळण्याचे कामही सुरू आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सर्व मराठी संपादकांना खुले पत्र मुंबई : मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीची, अस्मितेची ...
पोलिसांच्या मते, तपासाच्या सर्व बाजूंची सखोल चौकशी केली जात असून गोळीबारामागील नेमके कारण आणि आरोपींची ओळख लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.






