Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीBlinkit launches Ambulance : अवघ्या १० मिनिटांत दारात उभी राहणार रुग्णवाहिका, Blinkit...

Blinkit launches Ambulance : अवघ्या १० मिनिटांत दारात उभी राहणार रुग्णवाहिका, Blinkit ची नवीन सेवा

गुरुग्राम : क्विक कॉमर्स वेबसाईट ब्लिंकिटने एक मोठी घोषणा केली आहे. आतापर्यंत ब्लिंकिंटवरुन दैनंदिन वापराच्या वस्तू मागवल्या जायच्या, पण आता यावरुन चक्क अवघ्या १० मिनिटात Ambulance बोलवता येणार आहे. सध्या बहुतेक जण ब्लिंकिट डिलिव्हरी ॲपवरुन घरातील सामान मागवतात. आता ब्लिंकिटने आणखी एक सेवा सुरु केली आहे. Blinkit ने आता ‘१० मिनिटांत रुग्णवाहिका’ ही नवीन सेवा सुरु केली आहे. ब्लिंकिटकडून गुडगाव शहरात ही सेवा सुरु करण्यात आली आहे. ब्लिंकिटचे सीईओ अल्बिंदर धिंडसा यांनी गुडगाव वासियांसाठी ‘१० मिनिटांत रुग्णवाहिका’ सेवेची घोषणा केली आहे. यानुसार, आता ब्लिंकिट युजर्स आता आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत लोक ब्लिंकिट ॲपद्वारे रुग्णवाहिका बोलवू शकतात.

Three Friends Death After Hit Train : रेल्वे ट्रॅकवर पबजी खेळणाऱ्या तिघांचा मृत्यू

अवघ्या १० मिनिटांत दारात पोहोचणार रुग्णवाहिका

गुरुग्राम शहरामध्ये ब्लिंकिटची ही रुग्णवाहिका सेवा सध्या सुरू करण्यात आली आहे. लवकरच ब्लिंकिट देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये या योजनेचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात असल्याचं ब्लिंकिटचे सीईओ अलबिंदर धिंडसा यांनी सांगितलं आहे. शहरांमध्ये अनेक वेळा अपघातग्रस्तांना वैद्यकीय मदत वेळेवर मिळत नाही. ब्लिंकिटने ही समस्या दूर करण्यासाठी हे मोठं पाऊल उचलल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. १० मिनिटांत रुग्णवाहिका सेवेअंतर्गत आता लोक ब्लिंकिटवरुन रुग्णवाहिका मिळवू शकतील. अवघ्या १० मिनिटांत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचणार.

ब्लिंकइटमध्ये रुग्णवाहिका बुक करण्यासाठी बेसिक लाइफ सपोर्ट (बीएलएस) पर्याय जोडण्यात आला आहे. ब्लिंकिटने ॲम्ब्युलन्समध्ये कोणत्या सुविधा दिल्या जाणार, याबाबत माहिती दिली. कंपनीने केलेल्या पोस्टमध्ये २००० रुपयांमध्ये रुग्णवाहिका मागवता येईल, असे लिहिले आहे. मात्र, त्यात व्हेंटिलेटरचा सपोर्ट नाही. ब्लिंकिटच्या रुग्णवाहिकेत जीवन रक्षक उपकरणे असतील. यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर, ऑटोमॅटिक एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर(AED), स्ट्रेचर, मॉनिटर, सक्शन मशीन आणि इतर आपत्कालीन औषधांचा समावेश आहे.

एक्स पोस्टद्वारे दिली माहिती

ब्लिंकिंटच्या सीईओ अल्बिंदर धिंडसा यांनी यांसदर्भात एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, “आम्ही आमच्या शहरांमध्ये जलद आणि विश्वासार्ह रुग्णवाहिका सेवा पुरवण्याच्या समस्येचे निराकरण करण्याच्या दिशेने आमचे पहिले पाऊल पुढे टाकत आहोत. गुरुग्राममध्ये आजपासून पहिल्या ५ रुग्णवाहिका रस्त्यावर येणार आहेत. जसजसे आम्ही अधिक क्षेत्रांमध्ये सेवेचा विस्तार करु, तसतसे तुम्हाला बेसिक लाइफ सपोर्ट (बीएलएस) रुग्णवाहिका बुक करण्याचा पर्याय ब्लिंकिटवर दिसू लागेल”. येणाऱ्या २ वर्षात प्रत्येक मोठ्या शहरात ही सेवा उपलब्ध करून देण्याची कंपनीची योजना आहे. दरम्यान, ब्लिंकिटने रुग्णवाहिका सेवा देण्यासाठी रेड हेल्थसोबत भागीदारी केली आहे. रेड हेल्थ, ही एक रुग्णवाहिका सेवा देणारी कंपनी आहे, जी 24/7 रुग्णवाहिका सेवा देते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -