समोर आलेल्या माहितीनुसार, हौज रानी परिसरातील एका हॉटेल इमारतीत सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि धुराचे मोठे लोट संपूर्ण इमारतीत पसरले. त्यामुळे आत अडकलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आपला जीव वाचवण्यासाठी काही जणांनी खिडक्या आणि बाल्कनीकडे धाव घेतली, तर काहींनी इमारतीबाहेर पडण्याचा प्रयत्न केला.या दुर्घटनेत मृतांचा आखडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने 'स्वग्राम' (Swagram) बदलण्यासंदर्भातील ...
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक जवानांनी बचावकार्य सुरू करून इमारतीत अडकलेल्या अनेकांना सुरक्षित बाहेर काढले. दीर्घ प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
दिल्ली : मालवीय नगरमधील एका रेस्टॉरंटला भीषण आग; अनेक जणांचा मृत्यू . . .#prahaarnewsline #MarathiNews #fire #FireAccident #FireIncident #restaurant #retaurantfire #delhi pic.twitter.com/EjO1iFFDjJ
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) June 3, 2026
आता पर्यत मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर अनेक जण जखमी झाले आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत मृतांचा आखडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि अग्निशामक विभागाकडून घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे.
या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाकडून बचाव आणि मदतकार्य सुरू असून संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.






