पाटणा : बिहारमधील प्रसिद्ध शिक्षक आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून ओळखले जाणारे खान सर यांच्या कोचिंग सेंटरवर मंगळवारी रात्री झालेल्या हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत कोचिंग सेंटरमध्ये घुसलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याचा आरोप असून, अंदाधुंद गोळीबार झाल्याचीही चर्चा आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. (Khan Sir Coaching Classes Fire)
हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना खान सर यांनी या प्रकारामागे शेजारच्या काही कोचिंग संस्थांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला. "काही लोकांना माझ्याशी अडचण आहे. आमची फी कमी असून विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळतात, त्यामुळे काही प्रतिस्पर्धी संस्थांना ते खटकत आहे," असे ते म्हणाले. तसेच दोन दिवसांत कोचिंग संस्था उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्याचाही दावा त्यांनी केला. (Khan Sir Coaching Classes Fire)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना अखेर पावसाने दिलासा दिला आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर मुंबईसह ...
मात्र, या हल्ल्यामागे खान सर आणि इतर कोचिंग संस्थांच्या व्यवस्थापनामधील जुने वाद कारणीभूत असल्याचीही चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून या सर्व बाबींचा तपास केला जात आहे. (Khan Sir Coaching Classes Fire)
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे १०.५५ वाजण्याच्या सुमारास १० ते १२ जणांचा एक गट मुसल्लापूर हाट परिसरातील कोचिंग सेंटरमध्ये घुसला. त्यांनी कार्यालयात तोडफोड केली, बॅनर आणि पोस्टर्स फाडले तसेच विटा-दगडफेक केली. या गोंधळात कोचिंग संस्थेतील एक सुरक्षा रक्षक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (Khan Sir Coaching Classes Fire)
बैरूत : इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केलेल्या आवाहनानंतरही दक्षिण ...
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. रात्री सुमारे ११.१५ वाजता पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच खान सर देखील कोचिंग सेंटरमध्ये पोहोचले. (Khan Sir Coaching Classes Fire)
घटनेनंतर कोचिंग सेंटरच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Khan Sir Coaching Classes Fire)
View this post on Instagram






