
पाटणा : एका महिलेचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला आणि येवढ्यावरच न थांबता नराधमाने महिलेची हत्या केली असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बिहारमधील बांका जिल्ह्यात ही घटना घडली. ७० वर्षीय निवृत्त ANM ची हत्या करण्यात आली आहे. मृत स्त्रिचा मृतदेह बांका जिल्ह्यातील बेल्हार येथे नदीकाठी आढळून आला.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी हा चर्चेचा विषय ठरला आहे. मध्यंतरी विनोद कांबळीची प्रकृती खालावली असल्याने त्याला ठाणे येथील ...
मिळालेल्या माहितीनुसार, सुलतानगंजहून जमुईला जात असताना ७० वर्षीय वृद्ध महिलेला तिच्याच नातेवाईकांपैकी एकाने साथीदारांच्या मदतीने अपहरण करून सामूहिक अत्याचार केले. त्यानंतर ANM ची हत्या करण्यात आली. ओळख लपवण्यासाठी शीर धडापासून वेगळे केले. आणि नंतर नदीत फेकून दिले. तिच्या शोधासाठी पोलिस सातत्याने छापे टाकत होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी बांका जिल्ह्यातील बेल्हार येथे नदीच्या काठावर महिलेचा शिरच्छेद केलेला मृतदेह असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी बेल्हार पोलीस ठाणे हद्दीतील बडुआ नदीच्या कुमरेल घाटाजवळ एका महिलेचा मृतदेह जमिनीत गाडला होता. पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक आणि श्वान पथकाच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढला, तेव्हा तिची ओळख निवृत्त एएनएम म्हणून झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे शीर अद्याप सापडलेले नसून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेसंदर्भात पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या साथीदारांची चौकशी केली.