सिडनी कसोटीत पहिल्याच दिवशी ११ बळी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसअखेर भारताचा पहिला डाव १८५ धावांत आटोपला आहे तर ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा दोन धावा करून कर्णधार जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर केएल राहुलकडे झेल देऊन परतला आहे. ऑस्ट्रेलियाने दिवस संपेपर्यंत एक बाद नऊ धावा एवढी मजल मारली. अद्याप ऑस्ट्रेलिया १७६ धावांनी पिछाडीवर आहे.



रोहित शर्माने बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या चार पैकी तीन कसोटी सामन्यांतील पाच डावात फलंदाजी केली आणि फक्त ३१ धावा केल्या. या निराशाजनक कामगिरीमुळे संघ व्यवस्थापनाने कर्णधार रोहितला सिडनी कसोटीतून वगळण्याचा कठोर निर्णय घेतला. सिडनी कसोटीसाठी संघ व्यवस्थापनाने जसप्रीत बुमराहची कर्णधार म्हणून निवड केली. कर्णधार बदलला तरी भारताच्या कामगिरी अद्याप सुधारणा झालेली नाही. भारताचा पहिला डाव १८५ धावांत आटोपला. भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने सर्वाधिक ४० धावा केल्या. यशस्वी जयस्वाल १०, केएल राहुल ४, शुभमन गिल २०, विराट कोहली १७, रविंद्र जडेजा २६, वॉशिंग्टन सुंदर १४, प्रसिद्ध क्रिष्णा ३, जसप्रीत बुमराह २२ करून बाद झाले. नितीश रेड्डी शून्य धावा करून परतला. मोहम्मद सिराज ३ धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने सर्वाधिक चार तर मिचेल स्टार्कने तीन, कर्णधार पॅट कमिन्सने दोन बळी घेतले. नॅथन लियॉनने एक बळी घेतला.



बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिला कसोटी सामना भारताने तर दुसरा आणि चौथा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. अॅडलेड येथे झालेली तिसरी कसोटी अनिर्णित राहिली होती. यामुळे मालिकेत ऑस्ट्रेलियाकडे २ - १ अशी आघाडी आहे. आता सिडनीत पाचवी आणि निर्णायक कसोटी सुरू आहे. ही कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचे आव्हान भारतापुढे आहे.
Comments
Add Comment

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन

BCCI Update on Shubman Gill Injury : गिलची प्रकृती चिंताजनक? ९ विकेट्सवर टीम इंडियाचा डाव अचानक घोषित; BCCI ने काय खुलासा केला?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात रंगतदार

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन

लक्ष्य सेन जपान मास्टर्सच्या उपांत्य फेरीत

कुमामोतो : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने शुक्रवारी माजी विश्वविजेता सिंगापूरच्या लोह कीन यूवर