Smriti Mandhana : कौतुकास्पद! स्मृती मानधना पुन्हा ठरली आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल

आयसीसी क्रमवारीमध्ये भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना एकदिवसीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील मानधनाच्या दमदार कामगिरीमुळे तिला आयसीसी रँकिंग मध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळाले आहे.


स्मृती मानधनाने दक्षिण आफ्रिकेच्या लॉरे वोल्वार्डला मागे टाकत ७९० गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. तर वोल्वार्ड सध्या ७८२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आपल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारी एलिसा हीली ७४४ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिली. बेथ मुनी तिसऱ्या स्थानावर तर अॅशले गार्डनर (७२४) पाचव्या स्थानावर आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर नवव्या स्थानावर आणि जेमिमा रॉड्रिग्ज १२ व्या स्थानावर आहे.


तर गोलंदाजीमध्ये अलिना किंग (७७५) ने अव्वल स्थान पटकावले आहे.


गार्डनर (५१६) एकदिवसीय अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, दुसऱ्या स्थानावर असलेल्या वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्यूज (४१८) वर ९८ गुणांची आघाडी कायम ठेवली आहे. सदरलँड (५३४) २३ स्थानांनी झेप घेऊन ३४ व्या स्थानावर पोहोचली आहे. दीप्ती पाचव्या स्थानावर असून ती अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत पहिल्या १० मध्ये आहे.

Comments
Add Comment

BRICS : ब्रिक्स देशांच्या क्रीडामंत्र्यांचे संयुक्त घोषणापत्र

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे ब्रिक्स क्रीडा संयुक्त घ

Karn Sharma : कर्ण शर्माची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. यूपी टी२० लीग

Colombo Test : कोलंबो कसोटीत पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल, पडिक्कलचे शतक आणि गिलचे अर्धशतक

कोलंबो : देवदत्त पडिक्कलच्या सलग दुसऱ्या कसोटी शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या

Shubman Gill : शुभमन गिलच्या कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण

कोलंबो : भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार,

AUS vs BAN : मिचेल स्टार्कची कमाल, ऑस्ट्रेलियाने मॅके कसोटी एक डाव आणि ५१ धावांनी जिंकली

मॅके : मिचेल स्टार्कने घेतलेल्या एकूण १० बळींच्या (मॅचमधील दोन्ही डावांत मिळून) जोरावर ऑस्ट्रेलियाने

Ind vs SL 2nd Test Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालला बाद केल्यानंतर मैदानातच राडा; फर्नांडोसोबत जोरदार बाचाबाची

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच सत्रात मैदानावरील वातावरण चांगलेच