गोलंदाज जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ही कामगिरी करून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये १९.५२ च्या सरासरीने २०३, एकदिवसीय क्रिकेटमध्ये २३.५५ च्या सरासरीने १४९, टी २० मध्ये १७.७४ च्या सरासरीने ८९ आणि प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये २१.५० च्या सरासरीने २८६ बळी घेतले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल बारा वेळा, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये अठरा वेळा एका डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची किमया केली आहे. बुमराहने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची किमया केली आहे.



ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेत चार कसोटी सामन्यांमध्ये बुमराहने ३० बळी घेतले आहे. अद्याप एक कसोटी व्हायची आहे. या सामन्यात आणखी बळी मिळवून कामगिरी अधिक उंचावण्याची संधी बुमराहकडे आहे.



बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये यंदाच्या हंगामात ९०७ रेटिंग गुण मिळवले आहेत. याआधी कोणत्याही भारतीय गोलंदाजाला ९०४ पेक्षा जास्त रेटिंग गुण मिळवलेले नाहीत. आयसीसी कसोटी क्रमवारीत सध्या ८३७ रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानी असलेल्या पॅट कमिन्सने २०१९ मध्ये ९१४ रेटिंग गुण मिळवले होते. कसोटी क्रिकेटमध्ये ९१४ रेटिंग गुण ही गोलंदाजांमधील आतापर्यंतची सर्वोत्तम वार्षिक कामगिरी आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत सध्या दुसऱ्या स्थानी असलेल्या जोश हॅझलवूडने ८४३ रेटिंग गुण मिळवले आहेत.



कसोटीत सर्वोच्च रेटिंग गुण मिळवणारे भारतीय गोलंदाज

९०७ रेटिंग गुण - जसप्रीत बुमराह - २०२४
९०४ रेटिंग गुण - आर. अश्विन - २०१६
८९९ रेटिंग गुण - रवींद्र जडेजा - २०१७
८७७ रेटिंग गुण - कपिल देव - १९८०
८५९ रेटिंग गुण - अनिल कुंबळे - १९९४
८११ रेटिंग गुण - विनू मांकड - १९५२
८०६ रेटिंग गुण - सुभाष गुप्ते - १९५६
Comments
Add Comment

Dnyaneshwari Yadav : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवला महिलांच्या ५३ किलो वजनी गटात रौप्यपदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवला महिलांच्या ५३ किलो वजनी गटात रौप्यपदक ग्लासगो :युवा

ISSF World Cup : चिनी खेळाडूला धूळ चारत ईशा सिंगने जिंकले सुवर्णपदक; कोण आहे इशा सिंग ? मनू भाकरला कांस्यपदकावर मानावे लागले समाधान

हांगझोऊ : जागतिक क्रीडा जगतात भारतीय नेमांबाजांनी पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण केला आहे. चीनमधील हांगझोऊ येथे

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा सुवर्ण जलवा! ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत हॅट्रिक, पंतप्रधान मोदींसह देशभरातून कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली : भारतीय वेटलिफ्टिंगची स्टार खेळाडू मीराबाई चानूने (Mirabai Chanu) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ग्लासगो येथे

IND vs ZIM T20 : 'बेबी बॉस' वैभव सूर्यवंशीचा जलवा; झिम्बाब्वेला क्लिन स्वीप देत टीम इंडियाचा दणदणीत विजय

हरारे: भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत शानदार कामगिरी करत यजमान संघाला व्हाईटवॉश

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक विक्रम! २२ दिवसांतच सचिनचा ३४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

मुंबई : भारतीय क्रिकेटचा नवा सुपरस्टार ठरत असलेल्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) आणखी एक ऐतिहासिक पराक्रम आपल्या

Mayank Yadav : मयंक यादवची विक्रमी गोलंदाजी! पहिल्याच चेंडूवर विकेट!

भारताचा युवा वेगवान (Fast Bowler) गोलंदाज मयंक यादव (Mayank Yadav) दुखापतीतून (Injury) पुनरागमन (Comeback) केल्यानंतर दमदार लयीत दिसत आहे.