IND vs WI: एका ओव्हरमध्येच सगळंच बदललं; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कधी झाला?

मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पाच विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. भारताकडून संजू सॅमसनने केलेल्या नाबाद ९७ धावांच्या खेळीने हा विजय सहज साकार करता आला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हर मध्ये १९५-४ धावा केल्या होत्या. भारताने १९.२ ओव्हर मध्ये हे आव्हान पूर्ण करत पाच विकेटने विजय मिळवला. भारताने हा विजय मिळवला असला तरी वेस्ट इंडिजने काही सहजासहजी सामना सोडलेला नव्हता. संपूर्ण सामन्याचा एक असा टर्निंग पॉईंट आहे, जिथे खऱ्या अर्थाने म्हणता येईल की भारताच्या बाजूने सामना झुकला. नेमका कोणता जाणून घ्या.


या सामन्यामध्ये देव पावला अन् सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला. भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वर्ल्ड कप मधील सर्व सामने पाहता, भारताची गोलंदाजी कुठेतरी कमकुवत दिसली. त्यामुळे आजच्या सामन्यातही गोलंदाजांच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागून होतं. आजचा सामना खऱ्या अर्थाने गोलंदाजीमध्येच फिरला तो नेमका कुठे?


वेस्ट इंडिज संघाने बॅटींगला आल्यावर सुरुवातीला थोडासा सावध पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला. सुरुवातीच्या दोन ओवर्समध्ये त्यांनी थेट आक्रमण केले नाही पण त्यानंतर तिसऱ्या ओव्हरपासून सुरुवात केली होती. कॅप्टन शाई होप आज गतीने खेळताना दिसला नाही. त्यामुळे रोस्टन चेज याने आक्रमक खेळायला सुरुवात केली होती. मात्र वरूण चक्रवर्तीने ९ नव्या ओव्हरला त्याला आऊट केले. त्यानंतर मैदानात आलेल्या हेटमायर याने आपल्या शैलीत खेळायला सुरुवात केली. अवघ्या १२ बॉलमध्येच त्याने २७ धावा करत भारतीय गोलंदाजांवर दबाव आणला होता. त्यामुळे वेस्ट इंडिज मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करणार असा दिसू लागलं होतं. पण त्यावेळी भारताचा संकट मोचक आणि यॉर्कर किंग म्हणून प्रसिद्ध असलेला बुमराहने संपूर्ण सामनाच एक ओव्हरला फिरवला. जर हेटमायर संजूसारखा टिकला असता तर सहज स्कोरही जास्त झाला असता. त्यामुले हेटमायरची विकेट महत्त्वाची होती.


वेस्ट इंडिज संघाची पहिली विकेट ६८ धावांवर गेली होती त्यानंतर हेटमायर त्याच्या खऱ्या रूपात यायला लागला होता. परंतु बुमराहने त्याला आपल्या जाळ्यात अडकवत त्याला आऊट केलं. बर हा गडी इतक्यावरच थांबला नाही, याच ओव्हरमध्ये पाचव्या चेंडूवर बुमराहने चेजला आऊट करत सामना पलटवला. त्यामुळे बुमराहने एकाच ओव्हरमध्ये घेतलेल्या दोन विकेट सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भारताने आता या विजयासह सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Comments
Add Comment

Mayank Yadav : मयंक यादवची विक्रमी गोलंदाजी! पहिल्याच चेंडूवर विकेट!

भारताचा युवा वेगवान (Fast Bowler) गोलंदाज मयंक यादव (Mayank Yadav) दुखापतीतून (Injury) पुनरागमन (Comeback) केल्यानंतर दमदार लयीत दिसत आहे.

Commonwealth Games 2026 Raja Muthupandi : कॉमनवेल्थमध्ये भारताचा दबदबा; गंभीर दुखापतीनंतर राजा मुथुपंडीने जिंकले रौप्यपदक

मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ (Commonwealth Games 2026) मध्ये भारताच्या वेटलिफ्टिंग संघाने (Weightlifting) दमदार कामगिरी कायम ठेवत आणखी एक

Mirabai Chanu : मीराबाई चानूची सोनेरी हॅटट्रिक!

ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा

Ind vs Zim : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली टी-२० मालिका; झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश !

भारताचा ३५ धावांनी दणदणीत विजय ! हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या

Rishikant Singh : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऋषिकांत सिंगला रौप्य पदक

ग्लासगो : भारताने २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपले दुसरे पदक मिळवले. ऋषिकांत सिंगने पुरुषांच्या ६०

Ind vs Zim : वैभव सूर्यवंशीचा वादळी खेळी ! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवले इतक्या धावांचे आव्हान

हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना हरारे स्पोर्ट्स