T20 World Cup : खेळाडूवर दुःखाचा डोंगर; रिंकू नंतर आणखी एका खेळाडूच्या वडिलांचे निधन

मुंबई : वर्ल्ड कपचा अंतिम सामना जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतशी प्रेक्षकांमध्ये सामन्याबद्दलची उत्सुकता वाढली आहे. अशातच क्रिकेटविश्वातून आणखी एक दुःखद वार्ता समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय फलंदाज रिंकू सिंग यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर आता श्रीलंकेचा दिग्गज माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज कुमार संगकारा यांच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



संगकारांच्या वडिलांचे निधन


मिळालेल्या माहितीनुसार, संगकारांचे वडील क्षेमा संगकारा यांचे ३ मार्च रोजी निधन झाले. ते श्रीलंकेतील कॅंडी येथील कोर्टात प्रसिद्ध वकील होते. वडिलांच्या निधनाची बातमी कळताच विश्वचषक स्पर्धेत समालोचनाची जबाबदारी सांभाळत असलेले संगकारा तातडीने मायदेशी रवाना झाले. ४ मार्च रोजी अंत्यसंस्कार पार पडणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली.


कुटुंबीयांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्यांच्या जाण्याने कुटुंब आणि परिचितांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.



रिंकू सिंग यांच्यावरही शोक


याआधी भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज रिंकू सिंग यांचे वडील खानचंद सिंग यांचेही अलीकडेच निधन झाले होते. सुपर ८ फेरीतील सामन्यानंतर ही घटना घडली होती. त्यानंतर रिंकू तातडीने घरी परतला आणि पुढे पुन्हा जोमाने संघात सहभागी झाला.



अंतिम सामन्यापूर्वी परतण्याची शक्यता


दरम्यान, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी संगकारा पुन्हा समालोचन पॅनेलमध्ये दिसतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)