नेरळ : नेरळ खांडा येथील अकराशे क्विंटल क्षमता असलेल्या गोदामात भाताचे हमी भाव केंद्र सुरू झाले. या केंद्रावर हमीभावाने भाताची खरेदी सुरू आहे. आतापर्यंत ४०० शेतकऱ्यांनी भाताची विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे. या केंद्राचे उद्घाटन नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र विरले यांचे हस्ते विक्रीसाठी आलेल्या भाताचे पूजन करून झाली. त्यानंतर जेष्ठ संचालक नारायण तरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भाताची खरेदी सुरू झाली. भाताची हमी भावाने विक्री करण्यासाठी आलेल्या पहिले शेतकरी कोल्हारे गावातील राहुल हजारे यांचे स्वागत संस्थेचे वतीने करण्यात आले.त्यावेळी उप सभापती रवींद्र झांजे,संचालक सावळाराम जाधव,शशिकांत मोहिते,नारायण तरे,यशवंत कराळे,विष्णू कालेकर,धोंडू आखाडे आदी उपस्थित होते.त्यावेळी शेतकरी मारुती विरले,राहुल हजारे,दत्ता सोनावले,दयानंद गवळी,सुशील कालेकर,भाऊ भोईर आदी उपस्थित होते. नेरळ येथील गोदाम पूर्ण भरल्यास कळंब येथील गोदाम उपलब्ध असल्याने तेथे देखील नंतर खरेदी केंद्र सुरू करता येणार आहे.
भाताचा सर्वसाधारण दर प्रती क्विंटल २३०० रुपये
भाताचा उच्च दर्जा दर प्रती क्विंटल २३२० रुपये