मुंबई: नव्या वर्षाची सुरूवात झाली आहे आणि पहिल्याच दिवशी दिलासादायक बातमी आली आहे. १ जानेवारी २०२५ला तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात(LPG Price) कपात केली आहे. गॅस सिलेंडरचे दर दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत १४ ते १६ रूपयांनी कमी करण्यात आले आहेत. दरम्यान, ही कपात कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात केली आहे. तर घरगुती सिलेंडरचे दर स्थिर आहेत. म्हणजेच यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
इतका स्वस्त झाला एलपीजी सिलेंडर
१ जानेवारी २०२५म्हणजेच वर्षाच्या पहिल्याच दिवशी १९ किलो वजनी गटाच्या एलजीपी सिलेंडरच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. राजधानी दिल्लीत १९ किलो वजनाच्या सिलेंडरची किंमत १ जानेवारीपासून १८०४ रूपये झाली आहे. १ डिसेंबरला ही किंमत १८१८.५० रूपये इतकी होती. म्हणजेच एका सिलेंडरचे दर १४.५० रूपयांनी घटवण्यात आली आहे. दिल्लीसह इतर महानगरांमध्येही याच्या किंमती बदलल्या आहेत.
Air Pollution : प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर
मुंबई-कोलकातामध्ये नवे दर
राजधानी दिल्लीशिवाय कोलकातामध्ये एक जानेवारीपासून व्यवसायिक गॅस सिलेंडरची किंमत १९२७ रूपयांनी घटून १९११ रूपये झाीली आहे. येथे १६ रूपयांची कपात करण्यात आली आहे. यासोबतच मुंबईत सिलेंडरचे दरही १५ रूपयांनी कमी झाले आहेत. डिसेंबरमध्ये १७७१ रूपयांना मिळणाऱ्या सिलेंडरचे दर १७५६ रूपये झाले आहे. चेन्नईबाबत बोलायचे झाल्यास येथे १९८०.५० रूपयांना मिळणारा १९ किलोचा सिलेंडर आता १ जानेवारी २०२५ पासून १९६६ रूपयांना मिळेल.
डिसेंबरच्या पहिल्या दिवशी महाग झाला होता सिलेंडर
याआधी डिसेंबरच्या १ तारखेला महागाईचा मोठा झटका लागला होता. १९ किलो वजनी गटाच्या गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. १ डिसेंबरला देशाची राजधानी दिल्लीत १९ किलो वजनाच्या गॅस सिलेंडरचे दर वाढून १८१८.५० रूपये झाले होते. हे दर नोव्हेंबरमध्ये १८०२ रूपये होते. कोलकातामध्ये १९११.५० रूपयांवरून १९२७ रूपये, मुंबईत १७५४.५० वरून १७७१ रूपये आणि चेन्नईमध्ये १९६४.५० वरून १९८०.५० रूपये झाला होता.
घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर
दीर्घकाळापासून १९ किलो वजनी गटाच्या गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने बदल होत आहेत. मार् १४ किलो वजनी गटाच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.