७७ बेकऱ्या बंद ; २८६ बांधकामांना काम बंद करण्याच्या नोटिसा
मुंबई (प्रतिनिधी) : वाढते प्रदूषण(Air Pollution) रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आता ॲक्शन मोडवर आली असून, पालिका प्रशासनाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर संयुक्तपणे ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत पालिका प्रशासनाने ७७ बेकऱ्या व २८६ बांधकामांना काम बंद करण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. यापैकी ७७ बेकऱ्या पूर्णपणे बंद करण्याच्या तयारीत पालिका प्रशासन असून याबाबतची कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्याची माहिती बृहनमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे.
मुंबईतील प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं पालिका डीप क्लीन ड्राईव्ह, अँटी फॉर्म मशीन यांसारखे विविध प्रयोग आणि उपकरणे वापरात आणत आहे. मुंबईतील प्रदूषणाचा टक्का कमी होत नसल्यानं आता बृहन्मुंबई महानगरपालिकेनं प्रदूषण करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे. पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, कोळसा आणि भांगरतील लाकडावर चालणाऱ्या ७७ बेकऱ्या प्रदूषण पसरवल्याप्रकरणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. २२५ पारंपरिक लाकडी दहन आधारित स्मशानभूमी पीएनजी आणि विजेमध्ये रुपांतरित करण्याचे काम सुरु आहे.
मुंबईत सुरु असलेल्या बांधकामांमुळे उडणारी धूळ हवा प्रदूषित करते, यावर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी जोर दिला. अशी बांधकामे बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती देखील आयुक्तांनी दिली आहे. प्रदूषणाबाबत पालिकेने ज्या गाईडलाईन जारी केल्या आहेत, त्यांचं पालन न करणाऱ्या बांधकामांना नोटीसा पाठवण्यात आल्या असून, त्यांना बांधकाम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बांधकाम व्यावसायिकांनी पुढील २४ तासांत काम न थांबवल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून हा अजामीन