नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी सोमवारी देशातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १३१ मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले. कला, साहित्य, विज्ञान, वैद्यकीय क्षेत्र, सामाजिक कार्य आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.
नवी दिल्ली : लोककला क्षेत्रात कार्यरत असल्याने सातत्याने लोकांमध्ये वावरत असतो, त्यामुळे जनतेचा सांस्कृतिक प्रतिनिधी या नात्याने पद्मश्री ...
सोमवारी पाच जणांना पद्मविभूषण, १३ जणांना पद्मभूषण आणि ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के.टी. थॉमस, प्रसिद्ध व्हायोलिन वादक एन. राजम, साहित्य व शिक्षण क्षेत्रातील पी. नारायणन आणि केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही.एस. अच्युतानंदन यांनाही पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. पद्मभूषण पुरस्कार मिळवणाऱ्यांमध्ये गायिका अलका याज्ञिक, अभिनेते अभिनेते मम्मुटी, झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी, उद्योगपती उदय कोटक, जाहिरात क्षेत्रातील पीयूष पांडे आणि माजी टेनिसपटू अमितराज यांचा समावेश आहे.
मुंबई : जो देश कधी याचकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळायचा तो देश मोदी सरकारच्या बारा वर्षांच्या कार्यकाळात आत्मनिर्भर भारत म्हणून जगाच्या ...
याशिवाय पद्मश्री पुरस्कारासाठी अभिनेता आर. माधवन, क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, पॅरा-अॅथलीट प्रवीण कुमार, तमाशा कलावंत रघुवीर तुकाराम खेड़कर यांच्यासह विविध क्षेत्रांतील ११३ मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.
मुंबई : सिद्धिविनायक मंदिरात देश विदेशातून भाविक येत असतात. भाविकांना सुलभ व कमी वेळामध्ये सिद्धिविनायकाचे दर्शन झाले पाहिजे. मंदिर परिसरात पायाभूत ...
यांना मिळाला 'पद्मश्री' : पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्यांमध्ये ए. ई. मुथुनायगम, अनिल कुमार रस्तोगी, अशोक खाडे, अशोक कुमार सिंह, बलदेव सिंह, भगवानदास रायकरवार, बुद्धा रश्मि मणी, दीपिका रेड्डी, गफरुद्दीन मेवाती जोगी, हरमनप्रीत कौर भुल्लर, इंदरजीत सिंह सिद्धू, जनार्दन बापुराव बोथे, ज्योतिष देबनाथ, के. विजय कुमार, कुमार बोस, महेंद्र कुमार मिश्रा, मंगला कपूर, मोहन नागर, नारायण व्यास, नरेश चंद्र देव वर्मा, डॉ. पद्मा गुरमेट, प्रभाकर बसवप्रभु कोरे, प्रतीक शर्मा, प्रोसेनजीत चटर्जी, रोहित शर्मा, सविता पुनिया, शशी शेखर वेम्पती, श्रीरंग देवाबा लाड, सिवसंकरी, स्वामी ब्रह्मदेव महाराज, तरुण भट्टाचार्य, तृप्ती मुखर्जी आणि इतर अनेक मान्यवरांचा समावेश आहे.
रायगड : रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील धोकादायक आंबेनळी घाटात मध्यरात्री अपघात झाला. प्रवाशांनी ...
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला पद्मश्रीने सन्मानित
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी पद्मश्री पुरस्कारने गौरविण्यात आले. क्रिकेटमधील योगदानामुळे तिला हा पुरस्कार देण्यात आला आहे. भारताला चौथा मोठा नागरी पुरस्कार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघाने मागच्या वर्षी वनडे वर्ल्डकप जिंकला होता. पहिल्यांदाच भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. महिला क्रिकेटही कुठे मागे नाही? जेतेपद मिळवून कर्णधार हरमनप्रीत कौरने दाखवून दिलं होतं. हरमनप्रीत कौर पंजाबच्या छोट्याशा शहरातून आली आणि देशांचे नाव मोठे केले. तिच्या अलौकिक कामगिरीसठी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. हरमनप्रीत कौर हिचा जन्म ८ मार्च १९८९ साली पंजाबच्या मोगा येथे झाला. लहानपणापासूनच हरमनप्रीत कौरला क्रिकेटची आवडी होती. तिने चांगल्या खेळीच्या जोरावर संघात स्थान मिळवले आणि संघाचे कर्णधारपही भूषवले.
हरमनप्रीत कौरने २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली होती. तिने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करून भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात हातभार लावला. तिने आतापर्यंत ७ कसोटी, १६४ वनडे आणि १९५ टी २० सामने खेळले आहेत. कसोटीत २३० धावा, वनडेत ४ हजार ५४१ धावा आणि टी २० मध्ये ९ हजार ९९१ धावा केल्या आहे. वनडे वर्ल्डकप २०१७ मधील तिची नाबाद १७१ धावांची कायम स्मरणात राहणारी आहे. तिने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरूद्ध चमकदार कामगिरी केली.
प्रवीण कुमारला पद्मश्री पुरस्कार : पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पॅरा उंच उडीपटू प्रवीण कुमार याचाही सन्मान करण्यात आला. त्यालाही पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्याने दिव्यांग असूनही हार पत्कारली नाही. जिद्द बाळगून पॅरिस २०२४ पॅरालिम्पिक स्पर्धेत टी ६४ गटातील जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावून सुवर्ण पदक पटकावले.





