मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या मंडीतील खासदार कंगना रणौत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असते. कंगना रनौत हिने नुकतीच हिमाचल प्रदेशातील महिलांची तुलना बॉलीवूड अभिनेत्रींसोबत केली आहे. कंगनाने हिमाचल प्रदेशमध्ये जन्मलेल्या किंवा वाढलेल्या प्रीती झिंटा आणि यामी गौतमसारख्या अभिनेत्रींचे फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले आहे की आमच्यापेक्षा चांगल्या दिसणाऱ्या स्त्रिया आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गुरं, शेळ्या-मेंढ्या आणि पशुपालन करत आहेत.
Gautami Patil : गौतमी पाटीलने केलं प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन
कंगनाने स्वतःच्या तसेच प्रीती झिंटा, यामी गौतम आणि लापता लेडीज फेम अभिनेत्री प्रतिभा रंता यांच्या छायाचित्रांचा कोलाज शेअर केला आहे. यासोबत तिने लिहिले आहे की, हिमाचल प्रदेशचे लोक. जेव्हा मी हिमाचलला जाते आणि शेतात अथक काम करणाऱ्या आमच्या बरोबरीच्या किंवा त्याहून अधिक सुंदर स्त्रिया पाहते, तेव्हा तेथे कोणताही इन्स्टा किंवा रील नाही, त्या शेळ्या-मेंढ्या पाळतात आणि आपला उदरनिर्वाह करतात. या महिला नक्कीच प्रसिद्ध होऊ शकतात, असे मला वाटते.
हिमाचल प्रदेशातील मंडी शहरात महिलांवरील अत्याचाराच्या सर्वाधिक घटना घडल्याचे एका सर्वेक्षण अहवालात समोर आल्याने कंगना रणौतची ही पोस्ट समोर आली आहे.
View this post on Instagram
कंगना रणौतचा मोस्ट अवेटेड चित्रपट इमर्जन्सी १७ जानेवारी २०२५ रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु सेन्सॉर बोर्डाने चित्रपट मंजूर करण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी काही वादग्रस्त दृश्ये काढून टाकण्याची आणि बदलण्याची मागणी केली होती, परंतु कंगना ते न काढता रिलीज करण्यावर अडून होती. कंगना सेन्सॉर बोर्डाविरोधात कोर्टात पोहोचली होती. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आता कंगनाला काही बदलांसह प्रमाणपत्र मिळाले आहे.
या चित्रपटात कंगना रनौतसोबत अनुपम खेर, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटात कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.