Sunday, April 26, 2026

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. मोठ्या प्रमाणात तर्कवितर्क सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सूत्रांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल शुक्रवार १५ मे २०२६ किंवा त्याआधी जाहीर होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. डिजीलॉकरच्या अधिकृत वेबसाईटवर "Class 12th Result 2026 Coming Soon" असा संदेश दिसू लागला आहे. निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्यामुळे डिजीलॉकरच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा निकाल लवकरच असा संकेत देणारा संदेश दिसू लागल्याचे मत अनेकजण व्यक्त रत आहेत. पण सूत्रांनी बारावीचा निकाल शुक्रवार १५ मे २०२६ किंवा त्याआधी जाहीर होईल, असे सांगितले. तर काही मीडिया रिपोर्टनुसार बारावीचा निकाला २५ मे च्या आधी जाहीर होईल. अद्याप मंडळाने बारावीच्या निकालाच्या अधिकृत तारखेची घोषणा केलेली नाही. पण येऊ लागलेल्या रिपोर्टमुळे बारावीची परीक्षा दिलेल्यांची धाकधूक वाढण्यास सुरुवात झाली आहे. बारावीचा निकाल ऑनलाईन तपासण्यासाठीच्या निवडक वेबसाईट : mahresult.nic.in , hscresult.mkcl.org , results.digilocker.gov.in , mahahsscboard.in बारावीचा निकाल बघण्यासाठी आधी ही तयारी करा विद्यार्थ्यांनी बारावीचा निकाल बघण्यासाठी सोबत हॉल तिकिटातील सर्व माहिती ठेवावी. ऑनलाईन निकाल बघण्यासाठी हॉल तिकिटावरील सीट नंबर अर्थात आसन क्रमांक किंवा बैठक क्रमांक तसेच अर्जावर नोंदवलेले आईचे नाव व्यवस्थित टाईप करावे लागेल. महाराष्ट्र बोर्ड एकाच वेळी विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक शाखांचे निकाल जाहीर करणार आहे. मागील वर्षी विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.३५% लागला होता. यावर्षीही निकालाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा