‘असे’ असतील पर्यायी मार्ग
पुणे : बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाची येत्या सोमवारी सोमवती यात्रा (Jejuri Somvati Yatra) भरणार आहे. ३० डिसेंबर रोजी सोमवती अमावास्येनिमित्त भरणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने दुपारी १ वाजता खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याचे गडावरून प्रस्थान केले जाणार आहे. या यात्रेदरम्यान भाविकांची नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळते. अशावेळी वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
Chandrashekhar Bawankule : शिर्डीतील अधिवेशनात जनतेच्या आश्वासनाची वचनपूर्ती महत्त्वाची ठरणार!
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार ३० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहे. सोमवती अमावस्या यात्रेकरीता येणारी हलकी आणि इतर वाहने वगळून जड-अवजड वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मागनि वळविण्यात येणार आहे. यामध्ये सातारा, लोणंद, फलटण, बारामती येथून पुण्यात येणारी जेजुरी सासवड मार्गे वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.
पर्यायी मार्ग कोणते?
- बेलसर कोथळे नाझरे सुपे मोरगाव रोड मार्गे बारामती किंवा फलटण या मार्गे वळविण्यात येत आहे.
- रामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी वाहनांची वाहतूक बंद करुन ती मोरगाव सुपा केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामागनि पुणेकडे वळविण्यात येत आहे.
- पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण सातारा बाजुकडे जाणारी वाहनांची वाहतूक पुर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपूर-कापूरहोळ मार्गे सातारा फलटण किंवा सासवड वीर फाटा परींचे वीर-वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे.
- सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी-सासवडकडे येणारी वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने नीरा मोरगाव सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गान पुणेकडे वळविण्यात येत आहे.