Friday, March 21, 2025
HomeदेशLPG सिलेंडर, कारच्या किंमती आणि पेन्शन, १ जानेवारीपासून होणार हे मोठे ६...

LPG सिलेंडर, कारच्या किंमती आणि पेन्शन, १ जानेवारीपासून होणार हे मोठे ६ बदल

मुंबई: नवे वर्ष सुरू होण्यासाठी फक्त एकच आठवडा उरला आहे. नव्या वर्षात नवे नियमही येत आहेत. याचा सरळ परिणाम तुमच्या खिशावर पडणार आहे. यात कारच्या किंमती, एलपीजी सिलेंडरच्या किंमती, पेन्शनशी संबंधित नियम, अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप, यूपीआय १२३ पेचे नियम आणि एफडीशी संबंधित नियमांचा समावेश आहे.

कारच्या किंमतीत वाढ

नव्या वर्षात कार खरेदी करणे महाग होणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून मारुती सुझुकी, महिंद्रा, होंडा, मर्सिडिज बेंझ, ऑडी आणि बीएमडब्लू सारख्या प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्या गाड्यांच्या किंमतीत ३ टक्के वाढ करणार आहे.

एलपीजी सिलेंडरच्या किंमती

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या एलपीजीच्या दरांची समीक्षा करतात. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. मात्र व्यवसायिक सिलेंडरच्या दरात मात्र सातत्याने वाढ होत आहे.

पेन्शन काढण्याचे नियम

नवे वर्ष पेन्शनधारकांसाठी दिलासा देणारे आहे. १ जानेवारी २०२५ पासून कर्मचारी भविष्य निधी संघटनाने पेन्शन काढण्याच्या नव्या नियमांना सरळ बनवले आहे. आता पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतून आपली पेन्शन काढू शकतात.

अॅमेझॉन प्राईम मेंबरशिपसाठी नवे नियम

अॅमेझॉन प्राईम मेंबरशिपच्या नियमामध्ये बदलाची घोषणा झाली आहे. हे नवे नियम १ जानेवारी २०२५ पासून लागू होतील. नव्या नियमांतर्गत प्राईम अकाऊंटवरून आता केवळ दोन टीव्हीवरच प्राईम व्हिडिओ स्ट्रीम करता येणार आहे.

फिक्स डिपॉझिटचे नियम

आरबीआयने NBFCs आणि HFCs साठी फिक्स डिपॉझिटशी संबंधित बदल केले आहेत. नवे नियम १ जानेवारी २०२५ पासून लागू होतील.

यूपीआय १२३ पे ची नवी ट्रान्झॅक्शन लिमिट

फीचर फोन वापर करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सुरू करण्यात आलेली यूपीआय १२३ पे सेवामध्ये ट्रान्झॅक्शन लिमिट वाढवलेली आहे. याआधी या सेवेअंतर्गत अधिकाधिक ५००० रूपयांची देवाणघेवाण केली जाऊ शकत होती. मात्र आता ही मर्यादा १० हजार रूपये करण्यात आली आहे. ही सुविधा १ जानेवारी २०२५ पासून लागू होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -