Monday, April 27, 2026

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार (IMD Forecast) अकोल्यात सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याचं बघायला मिळतंय. अकोल्याचा पारा काल (रविवार) तब्बल 46.9 अंशावर गेला. काल अकोल्यात या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे तर पुढच्या दोन दिवसात हा रेकॉर्ड मोडला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ अमरावती (४६.८), वर्धा (४६.४), यवतमाळ (४६) आणि नागपूर (४५.४) यांचा क्रमांक लागला. विशेष म्हणजे अकोल हे जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत वरच्या क्रमांकावर पोहोचले आहे.

रविवारी देशातील सर्वात उष्ण १६ शहरांमध्ये महाराष्ट्रातील सहा शहरांचा समावेश झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे ही सर्व शहरे विदर्भ विभागातील आहे. अकोला ४६.९ अंश सेल्सिअससह सर्वात उष्ण होते, तर पुणे, सोलापूर आणि नाशिकमध्ये पारा ४० अंशांच्या पार गेला होता.

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच !

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (२७ एप्रिल) राज्यातील अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, बुलढाणा, नागपूर, वाशिम, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची तसेच उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Meteorological Department warning : हवामान खात्याचा इशारा याआधीच भारतीय हवामान खात्याने राज्यात उष्णतेच्या लाटेचा हायअलर्ट जारी केला होता. उन्हाच्या कडाक्याचा दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. शहरात ऐन दुपारी अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रस्ते आणि बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे. दरम्यान, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडू नये. बाहेर पडताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा गॉगल वापरणे, तसेच पाण्याची बाटली सोबत ठेवणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Nashik Weather : नाशिकमध्ये तपमानाचा पारा चाळीशीपार

नाशिकमध्ये आज (27 एप्रिल) सकाळचे किमान तपमान 24.3 अंश सेल्सिअस असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कमाल तपमानातही वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसापासून नाशिकचा पारा 41 अंशावर पोहचला आहे. शनिवारी 41.4, तर रविवारी 41.4 अंश सेल्सिअस कमाल तपमानाची नोंद करण्यात आली आहे.

देशातील ही शहरे सर्वाधिक हॉट संपूर्ण भारत सध्या कडाक्याच्या उन्हाने होरपळून निघत आहे. वायव्य आणि मध्य भारतात उष्णतेच्या लाटेने कहर केला असून नागरिक हैराण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात पुढील तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहील, अशी शक्यता व्यक्त केली आहे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >