Mumbai: मुंबई हादरली! आजोबांनीच केले १३ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार

मुंबई: मुंबईमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर ४० वर्षीय चुलत आजोबांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पवईमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासांमध्ये त्याला अटक केली. या घटनेमुळे पवईमध्ये खळबळ उडाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार गेल्या महिन्याभरापासून या मुलीवर लैंगिक अत्याचार सुरू होते. मुलीचे आई-वडील कामावर गेल्यावर चुलत आजोबा हे घाणेरडं कृत्य करत होता. मुलीवर अत्याचार केल्यावर आरोपी तिला धमकी देखील देत होता त्यामुळे पीडित मुलगी निमुटपणे सर्वकाही सहन करत होती.कोणाला सांगितल्यास तुझ्या आई-वडिलांना जीवे मारेल अशी धमकी आरोपी पीडित मुलीला देत होता. पण त्रास होऊ लागल्यामुळे पीडित मुलीने घटनेची माहिती आपल्या आईला दिली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या आईने तात्काळ पवई पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.


पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली.

Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील