मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटल्यानंतरही महायुतीत सुरू असलेला मंत्रिपद वाटपाचा गोंधळ अद्यापही कायम आहे. मुख्यमंत्रिपदासह अन्य महत्त्वाची खाती कोणाकडे असणार, याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागील चार दिवसांपासून आजारी असल्याने महायुतीतील चर्चेला ब्रेक लागला होता.
Amit shah-Ajit pawar : अजित पवारांना न भेटताच अमित शाह गेले चंदीगडला
मात्र आता प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे आजपासून सक्रिय होणार असून शिंदे यांच्या नेतृत्वात विविध बैठका होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे सकाळी बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते पक्षातील विविध नेत्यांना भेटतील. मागील दोन दिवस ठाण्यात असूनही तब्ब्येत बरी नसल्याने शिंदे यांनी आमदार खासदारांच्या भेटीगाठी टाळल्या होत्या. त्यामुळे आज ते मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांना भेटतील.
तसेच सत्तेत आपला वाटा कसा असावा, याबाबत ते शिवसेनेतील महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचे समजते.दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याने महायुतीची रखडलेली एकत्रित बैठकही लवकरच होऊ शकते. याच बैठकीत उपमुख्यमंत्रिपदासह खातेवाटपाविषयी सविस्तर केली जाण्याची शक्यता आहे.