Tuesday, February 11, 2025
HomeदेशMaharashtra CM: राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेन्स कायम, शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर मुंबईत परतले शिंदे,...

Maharashtra CM: राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेन्स कायम, शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर मुंबईत परतले शिंदे, फडणवीस, पवार

मुंबई: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? गेल्या अनेक दिवसांपासून सगळ्यांनाच पडलेला हा प्रश्न. विधानसभा निवडणुकीच्या निकालाल ६ दिवस उलटून गेले तरी अद्याप याचे उत्तर सापडलेले नाही. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोण बसणार यावरून दिल्लीमध्ये जोरदार बैठका सुरू आहेत. गुरूवारी रात्री दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची तीन तास बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे अध्यक्ष नड्डाही उपस्थित होते. सोबतच एनसीपी खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही होते.

सूत्रांच्या माहितीनुसार गृहमंत्र्यांनी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी वेगवेगळी बातचीत केली. तिघांसोबत शाह यांनी कॅबिनेट विस्ताराबाबत चर्चा केली. खासदारांची संख्या पाहता भाजपला २० मंत्रालये आपल्याकडे हवी आहेत. तर एनसीपीपेक्षा शिवसेनेला अधिक मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे.

बैठकीनंतर मुंबईत परतले तीनही नेते

दरम्यान, कोणते विभाग कोणाकडे असणार याबाबत चर्चा झालेली नाही. सगळ्यात विशेष म्हणजे मीटिंगनंतर मुख्यमंत्रीपदाबाबत असलेला सस्पेन्स अद्याप कायम आहे. मीटिंग तीन तास सुरू होती. त्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तीनही नेते रात्री उशिरा मुंबईत परतले. आज फोनवर दुसऱ्या दौऱ्याची बातचीत होणा असल्याची माहिती आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -