Ajit Pawar : थोडक्यात वाचलास..., अजित पवारांचा रोहित पवारांना टोला

  115

प्रीतीसंगमावर पुतण्याने काकांना केला वाकून नमस्कार


सातारा : यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त आज प्रीतीसंगमावर अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली. अशातच आज पवारांच्या तीन पिढ्या शरद पवार, (Sharad Pawar) अजित पवार (Ajit Pawar) आणि रोहित पवार (Rohit Pawar) प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाणांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होत्या. यावेळी प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार काही वेळासाठी आमने-सामने आले. त्यावेळी काका अजित पवारांना पुतण्या रोहित पवारांनी वाकून नमस्कार केला. अजित पवारांनी रोहित पवारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत, ऑल द बेस्टही म्हटले.


रोहित पवार समोर आल्यानंतर अजित पवारांनी त्यांना हस्तांदोलन केले आणि त्यांना काकांच्या पाया पड, असे म्हणत खाली वाकून नमस्कार करण्यासाठी आग्रह केला. रोहित पवारांनी क्षणाचाही विलंब न लावता, अजित पवारांना खाली वाकून नमस्कार केला. त्यानंतर रोहित पवारांना निवडून आल्याबद्दल अजित पवारांनी अभिनंदन केले आणि दाद्या, थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर, काय झालं असतं विचार कर... असा टोलाही अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला.


?si=MFpaMPROh6lCT9WR

या भेटीनंतर रोहित पवार म्हणाले की, अजित पवार (Ajit Pawar) माझे काका आहेत, म्हणून मी पाया पडलो. शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणे माझी जबाबदारी आहे. माझी सभा झाली असती, तर अडचण झाली असती.. असं विधान देखील अजित पवारांनी केलं. यावर रोहित पवारांना विचारले असता नक्कीच अजित पवारांची सभा झाली असती तर वर-खाली झालं असतं, उलटंही होऊ शकलं असतं. पण ते बारामतीमध्ये अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. शेवटी अजित पवार मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता. त्यांचे आमदार देखील मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. चांगली गोष्ट आहे, मी त्यांचे अभिनंदन देखील केले, असे रोहित पवार यांनी सांगितले.

Comments
Add Comment

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

मराठा आरक्षणासाठी समितीचे नवीन अध्यक्ष!

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती' सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाच्या

दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाकडून लैंगिक अत्याचार

जळगाव : दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकानेच शेतात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घडली. जळगावच्या पाचोरा