मुंबई : राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला. यात आमचा झालेला पराभव स्वीकरत आहोत. मात्र, आमची अपेक्षा होती तसा निकाल लागला नाही, पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार(Sharad Pawar) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पवार म्हणाले की, आमची अपेक्षा होती तसा निकाल नाही लागला, पण हा लोकांचा निर्णय आहे. त्यांनी निकालाचे अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले आणि आम्ही पुन्हा जोमाने कामाला लागू. मी निवृत्त व्हावं की नाही, हे मी व माझे सहकारी ठरवतील. निवडणुकीपूर्वीही त्यांनी संसद सदस्यतेबाबत पुनर्विचार करण्याची शक्यता वर्तवली होती.
लाडकी बहीण योजनेचा प्रभाव
महिला मतदारांनी लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला पाठिंबा दिल्याचे पवारांनी मान्य केले. या योजनेत महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले, त्यामुळे महिलांमध्ये प्रभाव पडला.
पवारांनी यंदाच्या निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे सांगितले. तसेच, ईव्हीएमविषयी अधिकृत माहिती घेतल्याशिवाय काही सांगणे अशक्य असल्याचे मत व्यक्त केले.