Saturday, June 6, 2026

Raigad : १९६२ पशुवैद्यकीय हेल्पलाईन आता व्हॉट्सअ‍ॅपवर

Raigad : १९६२ पशुवैद्यकीय हेल्पलाईन आता व्हॉट्सअ‍ॅपवर

अलिबाग : गेल्या पाच वर्षांत भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड, इंडसइंड बँक व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या १९६२ या टोल-फ्री हेल्पलाईनने रायगडसह राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे जाळे बळकट केले आहे. मोबाईल व्हेटर्नरी युनिट्स म्हणजेच फिरत्या पशुवैद्यकीय वाहनांच्या माध्यमातून या उपक्रमाने विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या दारात पशुवैद्यकीय आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत ८ लाखांहून अधिक जनावरांवर उपचार करण्यात आले असून, यामुळे पशुधनाची वेळेवर, सुलभ व विश्वासार्ह काळजी घेणे शक्य झाले आहे.

या उपक्रमाच्या यशानंतर भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी सेवा अधिक गतिमान करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप-आधारित चॅटबॉट सेवा सुरू केली आहे. या डिजिटल उपक्रमाचा उद्देश संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सेवा मिळविणे सोपे करणे, संवाद सुलभ करणे व रिअल-टाइम (तत्काळ) पशुवैद्यकीय साहाय्य प्रदान करणे हा आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट सेवा- शेतकरी +९१९०६३१४२२९९ या क्रमांकावर संदेश पाठवून किंवा निश्चित केलेला क्यूआर कोड स्कॅन करून या चॅटबॉट सेवेचा लाभ घेऊ शकतात.

शेतकऱ्यांना होणारे फायदे

प्रवास न करता घरबसल्या पशुवैद्यकीय सेवांची उपलब्धता. पशुधनाच्या आरोग्याशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद, सरकारी योजना व त्यांच्या फायद्यांविषयी जागरूकतेत वाढ, सेवा मिळविण्यासाठी लागणारा वेळ व खर्चात बचत. पशुधनाचे आरोग्य व उत्पादकतेत सुधारणा, हा उपक्रम शेतकऱ्यांना डिजिटलदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व संपूर्ण राज्यात कार्यक्षम, सुलभ आणि तंत्रज्ञान-आधारित पशुवैद्यकीय आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी आणि पशुसंवर्धन विभाग परिश्रमपूर्वक कार्यरत आहे.

Comments
Add Comment