Friday, February 14, 2025
Homeताज्या घडामोडीGaurav More :याला म्हणतात नम्रता! होतोय कौतुकाचा वर्षाव!

Gaurav More :याला म्हणतात नम्रता! होतोय कौतुकाचा वर्षाव!

मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे ने आतापर्यंत आपल्या चाहत्यांचे त्याच्या कालाकृतीतून नेहमीच मनोरंजन केले. गौरवने अनेक कॉमेडी शोमध्ये काम केले आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने गौरवला लोकप्रियता मिळवून दिली. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या गौरवने टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं.गौरवचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. सध्या गौरवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गौरव बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या पाया पडताना दिसत आहे.

gaurav more

gaurav more

नुकतंच रानटी या मराठी सिनेमाचा ग्रँड प्रिमियर सोहळा पार पडला. या ग्रँड प्रिमियरला मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांबरोबर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. या सोहळ्याला गौरव मोरे उपस्थित होता. तर सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनीही या ग्रँड प्रिमियरला हजेरी लावली होती. या ग्रँड प्रिमियर सोहळ्यातील गौरव मोरे आणि कैलाश खेर यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत गौरव अभिनेता कैलाश वाघमारेशी बोलताना दिसत आहे. तेवढ्यात तिथे कैलाश खेर आणि रानटी सिनेमाचे दिग्दर्शक समित लक्कड येतात. त्यांना बघताच गौरव त्या दोघांच्याही पाया पडत असल्याचं दिसत आहे.

Reshma Shide : रेश्मा शिंदे पुन्हा अडकणार लग्नबंधनात!

गौरव च्या ह्या कृतीवर चाहते प्रचंड खुश आहेत. चाहत्यांकडून अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -