मुंबई : कुलाबा-सीप्झ मेट्रोच्या खोदकामामुळे गिरगावच्या काळाराम मंदिराला तडेमुंबई – कुलाबा-सीप्झ या मुंबईतील पहिल्या पूर्ण भूमिगत मेट्रो रेल्वे मार्गासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे गिरगावातील सुमारे दोनशे वर्षे जुन्या काळाराम मंदिराच्या कमानीला तडे गेले आहेत.
ही कमान कोसळू नये म्हणून लोखंडी रॉडचे टेकू देण्यात आले आहेत. या मंदिरातील मूर्ती काळ्या पाषाणापासून बनलेल्या आहेत. त्यामुळे हे मंदिर काळाराम मंदिर म्हणून ओळखले जाते. गिरगावमधील जगन्नाथ शंकर शेट मार्गावर हे मंदिर आहे.
मंदिरापासून काही मीटर अंतरावर मेट्रो मार्गावरील गिरगाव स्थानकाचे काम सुरू आहे. त्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे काळाराम मंदिराला तडे गेल्याचे गेल्या आठवड्या मंदिर संस्थानाच्या निदर्शनास आले. ही बाब मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून दिले आहे.