Thursday, May 28, 2026

Ajmer Former Sarpanch Murder Case : अजमेरमध्ये थरकाप उडवणारी घटना! स्कॉर्पिओत माजी सरपंचांसह चौघांना जिवंत जाळलं; अपघाताचा बनाव उघडकीस

Ajmer Former Sarpanch Murder Case : अजमेरमध्ये थरकाप उडवणारी घटना! स्कॉर्पिओत माजी सरपंचांसह चौघांना जिवंत जाळलं; अपघाताचा बनाव उघडकीस

अजमेर : राजस्थानातील अजमेर जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. माजी सरपंच, त्यांची आई, पत्नी आणि भाची यांना स्कॉर्पिओ गाडीत जिवंत जाळल्याचा संशय व्यक्त केला जात असून, सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणाने आता हत्येचे गंभीर वळण घेतले आहे. (Ajmer Former Sarpanch Murder Case)

ही घटना गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अजमेर शहरापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोराडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीरामपुरा गावाजवळ घडली. या भीषण घटनेत माजी सरपंच रामसिंह चौधरी, त्यांची आई पूसी देवी, पत्नी व जिल्हा परिषद सदस्या सुरग्यन देवी आणि भाची महिमा यांचा मृत्यू झाला. (Ajmer Former Sarpanch Murder Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओच्या मागील भागात तीन मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळले, तर सुरग्यन देवी यांचा अर्धवट जळालेला मृतदेह जवळच्या शेतात सापडला. त्यामुळे हा केवळ अपघात नसून, नियोजित हत्याकांड असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. (Ajmer Former Sarpanch Murder Case)

मिळालेल्या माहितीनुसार, रामसिंह चौधरी आपल्या आईला छातीत दुखत असल्याने रुग्णालयात घेऊन जात होते. सुरुवातीला वाहनाला आग लागून अपघात झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, घटनास्थळ आणि घरातील परिस्थिती पाहता पोलिसांना अनेक संशयास्पद बाबी आढळून आल्या. (Ajmer Former Sarpanch Murder Case)

घराच्या तपासणीदरम्यान पोलिसांना रक्ताचे डाग, दोन विटा आणि रक्त लागलेली आगपेटी सापडली. इतकेच नव्हे तर, जवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरमधून डिझेल काढल्याचेही समोर आले आहे. घर पूर्णपणे धुतल्याचे दिसून आले, ज्यामुळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. ज्या रुग्णालयात पूसी देवी यांना नेणे अपेक्षित होते, त्या मार्गाऐवजी स्कॉर्पिओ वेगळ्याच दिशेला आढळली. तसेच गाडीतील सीट दुमडलेल्या अवस्थेत होत्या. जर सर्वजण गाडीत बसले असते, तर सीट सरळ असायला हव्या होत्या, असा प्रश्न पोलिसांनी उपस्थित केला आहे. (Ajmer Former Sarpanch Murder Case)

या प्रकरणी पोलिसांनी रामसिंह चौधरी यांच्या दुसऱ्या पत्नी, मुलगा आणि काही कुटुंबीयांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अजमेरचे पोलीस अधीक्षक हर्षवर्धन अग्रवाल यांनी सांगितले की, घटनेमागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसला तरी पोलिस या प्रकरणाचा तपास हत्येच्या दृष्टिकोनातून करत आहेत. (Ajmer Former Sarpanch Murder Case)

दरम्यान, या घटनेनंतर रामसिंह चौधरी यांची एक जुनी सोशल मीडिया पोस्टही चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी करत, “मी माझ्या हक्कांसाठी लढत आहे, मला मदत करा,” असे आवाहन केले होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे जुना वाद किंवा जीवाला धोका असल्याची शक्यताही तपासली जात आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. (Ajmer Former Sarpanch Murder Case)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >