मुंबई : चारचौघी, हरवलेल्या पत्त्यांचा बंगला, वाडा चिरेबंदी, युगान्त, हॅम्लेट अशा बहुचर्चित नाटकांसह अनेक चित्रपट दिग्दर्शित (Marathi Drama) करणारे नामवंत दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी (Chandrakant Kulkarni) यांच्या नाट्यप्रवासाच्या पुस्तकाची विक्रमी वेळेत द्वितीय आवृत्ती प्रकाशित (2nd Edition published) होत आहे. या आवृत्तीच्या प्रकाशनच्या निमित्ताने चंदू सरांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाच्या नाटकांमधील सादरीकरणे आणि पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर ‘हॅम्लेट’ या नाटकातील प्रवेश सुमीत राघवन करणार आहे. नीना कुलकर्णी ह्यांच्या सारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीने गाजविलेल्या ‘ध्यानीमनी’ नाटकातील उतारा स्वतः नीनाताई सादर करणार आहेत तर, ‘येळकोट’ ह्या नाटकातील प्रसंग संकर्षण कऱ्हाडे आणि आशुतोष गोखले सादर करणार आहेत. त्रिनाट्य धारेतील ‘मग्न तळ्याकाठी’ मधील प्रवेश चिन्मय मांडलेकर आणि पूर्वा पवार सादर करणार आहेत तसेच कै.भक्ती बर्वे आणि अतुल कुलकर्णी ह्यांनी गाजवलेल्या ‘गांधी विरुध्द गांधी’ ह्या नाटकातील प्रवेश ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि दस्तुरखुद्द चंद्रकांत कुलकर्णी सादर करणार आहेत.
Apurva Gore: ‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वाने शेअर केलेल्या ‘मोतीचूर लाडू’च्या फोटोचे गुपित काय
हा सोहळा २१ नोव्हेंबर रोजी यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा ह्या ठिकाणी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी सुरु होणार आहे. जुन्या काळात गाजलेल्या नाटकांतील प्रवेश पाहताना रमून जावे ह्यासाठी सदर सोहळा सर्वांसाठी विनामूल्य ठेवण्यात आलेला आहे.
या सोहळ्यासाठी खास वंदना गुप्ते, नीना कुलकर्णी, रोहिणी हट्टंगडी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले , सचिन खेडेकर, सुमीत राघवन ह्यांच्या बरोबरच नाट्य सिनेसृष्टीतील तसेच समाजातील अनेक नामवंत उपस्थित राहणार आहेत. (Chandrakant Kulkarni)