ठाणे : शहरातील गावदेवी मार्केटला आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेला एक अग्निशमन दलाचा जवान आणि एका सुरक्षारक्षकाचा कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर अग्निशमन दलाच्या दोन जखमी जवानांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्यात येईल असेही शिंदे यांनी जाहीर केले. आज संध्याकाळी त्यांनी गावदेवी मार्केटला भेट देऊन पाहणी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
उल्हासनगर : बदलापूरमध्ये उघडकीस आलेल्या बेकायदा स्त्री बीज दान प्रकरणाच्या तपासादरम्यान एका महिलेने तब्बल ३७ वेळा अंडाणू दान केल्याचे उघड झाले आहे. ...
गावदेवी मार्केटमधील आगीची घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या आगीत दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो असे शिंदे यांनी सांगितले. तसेच झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन या मार्केटचे आणि ठाण्यातील इतरही मार्केटचे तातडीने इलेक्ट्रिक ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जवानांना विम्याचे १२ लाख रुपये तातडीने देण्यासोबतच ठाणे मनपा कडून प्रत्येकी १० लाख रुपये देण्यात येतील असेही त्यांनी जाहीर केले.
उल्हासनगर : शहरातील कैलास कॉलनी चौक परिसरात गुरुवारी रात्री अचानक झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. दोन गटांतील जुन्या वैमनस्यातून ...
या आगीत व्यापाऱ्यांचे आणि गाळे धारकांचे मोठे नुकसान झाले आहे. अपरात्री आग लागल्याने त्यांना सामानही बाहेर काढता आले नाही. त्यामुळे मार्केट हे संपूर्णपणे आगीत जाळून गेले आहे. ठाणे मनपा आयुक्तांना हे मार्केट तातडीने स्वच्छ करून त्यात इलेक्ट्रिकचे काम पूर्ण करून येत्या १० दिवसात व्यापाऱ्यांना पुन्हा व्यवसायासाठी घे गाळे हस्तांतरित करावेत असेही निर्देश दिले असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
मुंबई : गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी सुरू केलेल्या मदत क्रमांकामुळे यावर्षी ...
यावेळी ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव, ठाणे मनपातील शिवसेना गटनेते पवन कदम, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नगरसेविका मृणाल पेंडसे, नगरसेवक मंदार कीणी, शिवसेनेचे ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, नौपाडा विभागप्रमुख किरण नाकती, आणि शिवसेनेचे आणि भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कळवा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस
यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन या घटनेत जखमी झालेल्या अग्निशमन दलाच्या दोन जवानांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टरांकडून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांचीही माहिती घेतली. यावेळी त्यांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले. तसेच गरज लागल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात यावे असेही स्पष्ट निर्देश दिले.



