दिल्ली-मुंबईकरांना कांद्याने रडवले
मुंबई : कांदा कापताना गृहीणींच्या डोळ्यामध्ये नेहमीच पाणी येते, पण सध्या किरकोळ बाजारामध्ये कांद्याच्या दराने(Onion Price) शंभरी गाठल्याने कांदा न कापताही सर्वसामान्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागले आहे. स्थानिक बाजारामध्ये कांदा ८० ते १०० रुपये किलो या दराने विकला जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केटमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून दररोज १००ते १२० ट्रक भरुन कांदा विक्रीला येत असून बाजार समिती आवारात हा कांदा ४५ ते ६२ रुपये किलो या दराने विकला जात असल्याची माहिती बाजार समिती आवारातील कांदा बटाटा मार्केटचे संचालक अशोक वाळूंज यांनी दिली.
नाशिक, नगर, जुन्नर, सोलापूर भागातून हा कांदा बाजार समिती आवारात येत असून त्यामध्ये जेमतेम २० ते ३० पिशवी नवीन कांदा विक्रीला येत आहे. मार्केटमध्ये विक्रीला येणारा कांदा हा जुना असून त्याच्या साली निघाल्या आहेत. पाऊसामुळे कांद्याला ओल असली तरी नवीन कांदा बाजारात येण्यास विलंब झाल्याने तुलनेने हा कमी दर्जाचा कांदा आज महाग दराने विकला जात आहे. बाजार समिती आवारात ४५ ते ६२ रुपये किलो असणारा कांदा बाजार समिती आवारापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सानपाडा परिसरात ८० ते ८५ रुपये किलोने कांदा विकला जात आहे. मुलुंड, ठाणे, भाडुंप, दादर, कुर्ला भागामध्ये कांदा शंभर रुपये किलोने विकला जात आहे. पाऊस न पडल्यास नवीन कांदा २० ते २२ दिवसांनी बाजारात दाखल होईल आणि कांद्याचे बाजारभाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील, अशी माहिती कांदा बटाटा मार्केटचे संचालक अशोक वाळूंज यांनी दिली.
दिल्ली आणि मुंबईत कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. दिल्ली-मुंबईत एक किलो कांदा ८० ते १०० रुपयांनी विकला जात आहे. मागील ५ वर्षानंतर नोव्हेंबरमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. दिल्ली आणि मुंबईत बाजारात एक किलो कांद्याच्या किंमती ७० ते ८० रुपये झाले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले आहे. मागील काही दिवसांत देशातील काही शहरात कांदा महागला आहे. या दरवाढीचा ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. या शहरातील कांद्याच्या किंमती ४० ते ६० रुपये किंमतीहून ७० ते ८० रुपये किलो इतक्या झाल्या आहेत. काही शहरातील कांद्याचा भाव दुप्पटीने वाढला आहे.
कांद्याचा भाव(Onion Price) अचानक वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरातील बाजारात ७० ते ९० रुपये किंमती दराने कांदा विक्री केली जात आहे. ८ नोव्हेंबरपर्यंत दिल्लीत कांद्याचा एक किलो दर ८० रुपये होता. मुंबईसह देशातील इतर शहरातही कांद्याचा दर वाढला आहे. बाजार समितीमधून स्थानिक बाजारामध्ये कांदा नेईपर्यत माथाडी, वाहतुक खर्च पाहता किलोमागे सहा ते आठ रुपये स्थानिक व्यापाऱ्याला अधिक खर्च होतात. तसेच शंभर किलोच्या गोणीमागे दोन ते तीन किलोची घट येते. त्यामुळे बाजार समितीच्या तुलनेत स्थानिक बाजारात कांदा १५ ते २० रुपये अधिक दराने विकला जात असतो. – अशोक वाळूंज, बाजार समिती संचालक