मुंबई: पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्याआधी भारतीय संघाचे हेड कोच गौतम गंभीरने(Gautam Gambhir) सोमवारी पत्रकार परिषद घेतली. कोच गंभीरने या पत्रकार परिषदेत आपल्या स्वभावानुसार तिखट प्रहार केले. त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाला इशाराही दिला की भारतीय संघ पहिल्या बॉलपासून आक्रमण करेल.
गंभीरच्या मते भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यात संपूर्ण तयारिनीशी उतरणार आहे. मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरला पर्थच्या मैदानावर असणार आहे. गंभीरने पत्रकार परिषदेत सांगितले, जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये खेळता तेव्हा सगळ्यात मोठे आव्हान तेथील वातावरण असते. १० दिवसांत आम्ही चांगली तयारी करू.
कोच पुढे म्हणाले, आम्ही एका चांगल्या स्थितीत असू. आम्ही अनेकदा ऑस्ट्रेलियाला गेलो आहोत आणि २२ तारखेला पूर्ण तयार असू. पहिल्या बॉलपासून आक्रमण करू.
रोहितच्या फॉर्मबाबत गंभीर(Gautam Gambhir) म्हणाले, मी कोहली अथवा रोहितबाबत चिंतित नाही. आमचे खेळाडू दमदार कामगिरीसाठी सज्ज आहेत. ही बाब गेल्या मालिकेत सिद्ध झाली आहे.