Tuesday, April 28, 2026

Cooperative Building : सहकार भवनांच्या बांधकामास गती; नियोजित वेळेत पूर्णत्वासाठी प्रयत्न

Cooperative Building : सहकार भवनांच्या बांधकामास गती; नियोजित वेळेत पूर्णत्वासाठी प्रयत्न

मुंबई : राज्यातील सहकार भवन व सहकार संकुलांच्या बांधकाम कामांचा आढावा घेण्यासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज साखर भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीत विविध प्रकल्पांची सद्यस्थिती, निधी उपलब्धता व कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मंत्री पाटील यांनी सर्व प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून कामांना गती द्यावी, असे निर्देश दिले.

राज्यातील सहकार भवन बांधकाम प्रकल्पांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे

छत्रपती संभाजीनगर : या ठिकाणी सहकार संकुलासाठी २८ ऑगस्ट २०२३ रोजी शासन मान्यता देण्यात आली असून १०५.७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. १३ मार्च २०२४ रोजी कार्यादेश देण्यात आला. सध्या प्रशासकीय इमारतीचे सहाव्या स्लॅबचे काम पूर्ण झाले असून निवासी इमारतीचे पाचव्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

पुणे : पुणे येथील सहकार भवनासाठी पहिल्या टप्प्यात ९४.५९ कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात ३५.८१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सध्या तिसऱ्या स्लॅबचे काम पूर्ण झाले असून चौथ्या स्लॅबचे काम प्रगतीपथावर आहे. लोअर ग्राउंड मजल्याचे वीट बांधकाम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. हा प्रकल्प ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण होण्याचे नियोजन आहे.

बीड : बीड येथे सहकार संकुलासाठी १४.९९ कोटी रुपये मंजूर असून २२ डिसेंबर २०२५ रोजी कार्यादेश देण्यात आला आहे. सध्या बेसमेंट स्लॅबचे काम पूर्ण झाले असून तळमजल्याचे काम सुरू आहे. प्रकल्प ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे.

लातूर : लातूर येथील सहकार भवनासाठी २५.०१ कोटी रुपये प्रस्तावित असून तांत्रिक व आर्थिक निविदांची छाननी सुरू आहे. छाननीनंतर कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे.

नाशिक : नाशिक येथे सहकार भवनासाठी सुमारे ६७.३७ कोटी रुपयांचा प्रस्ताव असून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे.

अहमदपूर : अहमदपूर प्रकल्पासाठी ३० मार्च २०२६ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला असून शासन मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाठविलेल्या प्रस्तावावर शासनाने ७ एप्रिल २०२६ रोजी त्रुटीपूर्ततेबाबत सूचना केल्या आहेत.

Comments
Add Comment