मुंबई: भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ४ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना रविवारी खेळवलण्यात आला. यात भारताचा ३ विकेटनी पराभव झाला. सामन्यात स्टार फलंदाज संजू सॅमसनला खातेही खोलता आले नाही. तो ३ बॉल खेळून मार्को जॉनसनच्या बॉलवर क्लीन बोल्ड होत पॅव्हेलियनमध्ये परतला.
तर ाआधी पहिल्या दोन टी-२० सामन्यात संजूने सलग २ शतक ठोकले होते. एक शतक द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात होते. यासोबतच संजूने असा वर्ल़्ड रेकॉर्ड कायम केला आहे जो कोणीही बनवू शकलेला नाही. संजूने एका वर्षात ४ वेळा शून्यावर बाद होणारा पहिला भारतीय ठरला आहे.
संजू सॅमसनच्या आधी विराट कोहली, युसूफ पठाण आणि रोहित शर्मा एका वर्षात तीन वेळा शून्यावर बाद झाेले होते. आता संजूने हा रेकॉर्ड कायम केला आहे. आफ्रिकेविरुद्ध एका टी-२० मालिकेत शतक आणि त्यानंतर शून्यावर बाद होणारा संजू दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याआधी वेस्ट इंडिजच्या जॉनसन चार्ल्सची अशी स्थिती झाली होती.
सोबतच विकेटकीपर फलंदाज संजू एका कॅलेंडर इयरमध्ये २ शतके ठोकणारा आणि ४ वेळा शून्यावर बाद होणारा वर्ल्ड क्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरला आहे.