Monday, December 9, 2024
Homeताज्या घडामोडीPalghar News : पालघरमध्ये ४ कोटींची रोकड हस्तगत!

Palghar News : पालघरमध्ये ४ कोटींची रोकड हस्तगत!

पालघर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता (Code Of Conduct) लागू असतानाच मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जप्त करण्याचे प्रकार समोर येत आहेत. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने धडक कारवाई करत राज्यातील विविध ठिकाणी कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त (Cash Seized) केली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, सोलापूर, मराठवाडा यांसह आता पालघरमधूनही मोठ्या रक्कमेची रोकड जप्त झाली आहे.

९ नोव्हेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील वाडा येथे तीन कोटी सत्तर लाख रुपयांची रोकड सापडली. विक्रमगडकडे जाणाऱ्या संशयित वाहनाची तपासणी केली असता ही रोकड आढळून आली. या वाहनाने ऐरोली, नवी मुंबई येथून वाडा, जव्हार, मोखाडा मार्गावर जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनाची तपासणी केली आणि यातून कोट्यवधी रुपयांची रोकड उघड झाली.

पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी आणि वाहनांची तपासणी केली जात आहे. वाडा पोलिसांना विक्रमगड मार्गावर संशयित व्हॅन दिसल्याने तपासणी केली असता त्यात तीन कोटी सत्तर लाख रुपयांची रोकड सापडली. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली असून तिचा उपयोग निवडणुकीत होण्याची शक्यता असल्याचा संशय आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -