मुंबई: यंदाची दिवाळी ‘भूलभुलैया’ असणार आहे. कार्तिक आर्यन पुन्हा एकदा रूहबाबाच्या अवतारात तुम्हाला दिसणार आहे. यावेळेस भूलभुलैया ३मध्ये बरंच काही वेगळं पाहायला मिळणार आहे. विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळेल. आमी जे तोमार ३.० व्हर्जनमध्ये यावेळेस दोन्ही अभिनेत्री आमनेसामने येत आहेत.
रिलीज झाले ‘आमी जे तोमार ३.०’ गाणे
सिनेमाच्या रिलीजच्या काही दिवस आधीच निर्मात्यांनी यूट्यूबवर आमी जे तोमार हे गाणे रिलीज केले आहे. यात विद्या आणि माधुरी यांचा जबरदस्त फेसऑफ दिसत आहे. दोघीही अतिशय शानदार डान्स करत आहेत. एकमेकींना टक्कर देत आहेत. विद्याने काळी आणि लाल रंगाची साडी नेसली आहे. केसांमध्ये गजरा माळला आहे. तर माधुरी लाल रंगाच्या अनारकली सूटमध्ये दिसत आहे. दोघींनी घुंगरू घातले असून त्या डान्स करत आहेत.
गाण्याची एक झलक
आमी जो तोमार हे त्याच व्हर्जनचे गाणे आहे जे प्रेक्षकांनी २००७मध्ये भूलभुलैया सिनेमात मंजुलिकाला नाच करताना पाहिले होते. यात विद्या बालन एकटीच होती. मात्र यावेळेस माधुरी दीक्षित सोबत दिसत आहे. चाहते हे गाणे पाहिल्यावर खूपच एक्सायटेड झाले आहेत. हे गाणे गीतकार प्रीतम यांनी कंपोज केले आहे. तर श्रेया घोषालचा आवाज आहे.