Thursday, June 4, 2026

Actress Sambhavna : शेवटी देवाने एका आईची हाक ऐकलीच; चक्क ४५ वर्षांच्या अभिनेत्रीने दिला जुळ्या मुलांना जन्म

Actress Sambhavna :  शेवटी देवाने एका आईची हाक ऐकलीच; चक्क ४५ वर्षांच्या अभिनेत्रीने दिला जुळ्या मुलांना जन्म

मुंबई : लग्नानंतर प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं की तिने आई व्हाव . काहीचं हे स्वप्न पूर्ण होतं तर काहींचं होत नाही . असंच खूप प्रयत्न करून सुद्धा अभिनेत्री संभावना हिचं आई होण्याचं स्वप्न काही पूर्ण होतं नव्हतं. अखेर वयाच्या ४५ व्या वर्षी अभिनेत्रीच्या घरात जुळ्या मुलांनी जन्म घेतला आहे.

संभावना सेठ आणि तिचा पती अविनाश द्विवेदी ह्यांच्या लग्नानंतर ह्या दाम्पत्याला मूल बाळ नव्हत.अनेक प्रयत्न करून सुद्धा त्यांच्या पदरात नेहमी आपयशच येत होत अखेर शेवटी त्यांनी IVF प्रक्रियेचा आधार घेतला पण नशिबाने तिथे सुद्धा साथ दिली नाही. आई होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संभावनाने एक-दोनदा नव्हे, तर तब्बल 8 वेळा IVF प्रक्रियेचा आधार घेऊन सुद्धा नेहमी तिच्या पदरात आपयशच येत होते .

इतकेच नाही, तर तिला गर्भपातनाच्या (Miscarriage) भीषण वेदनांमधूनही जावे लागले.संभावना मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही त्रासांमुळे खचून गेली होती. पण तिने आणि अविनाशने जिद्द सोडली नाही.

अखेर देवाची कृपा झाली :

अनेक प्रयत्ना नंतर देवाने माझं स्वप्न पूर्ण केल .यंदाची दिवाळी आमच्यासाठी लवकरच आली आहे अश्या शब्दात भावनिक पोस्ट संभावना सेठ हिने केली . एका मुलाला आणि एका मुलीला जन्म दिला अशी गूड न्यूज सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपल्या चाहत्यांना सांगितली. घरात लक्ष्मी आणि गणेश अशा दोन्ही रूपांत आनंद आल्याचे सांगताना दोघांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >